ICC World Cup 2025 Schedule : महिला वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅचची तारीख ठरली, वाचा पूर्ण वेळापत्रक
esakal June 16, 2025 08:45 PM

Women’s ODI World Cup 2025 match date and venue

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून भारतीय सैनिकांनी सडेतोड उत्तर दिले. दोन्ही देशांमध्ये युद्धही भडकले. पाकिस्तानला धडा शिकवायचा असेल तर त्यांच्यासोबत क्रिकेट सामनेही खेळणे बंद करा असा सूर आवळला गेला. पण, आताच हाती आलेल्या बातमीनुसार India vs Pakistan यांच्यात ५ ऑक्टोबरला महामुकाबला होणार आहे. २०२५ मध्ये ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या महिलांच्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक समोर आले आहे आणि आता भारत-पाकिस्तान सामन्याची तारीख समोर आल्याने क्रिकेट चाहत्यांची उत्सुकला शिगेला पोहोचली आहे.

आयसीसी ची सुरुवात ३० सप्टेंबरपासून बंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर यजमान भारत आणि श्रीलंकेच्या सामन्याने होणार आहे. त्यानंतर गतविजेता ऑस्ट्रेलिया १ ऑक्टोबर रोजी इंदूरमधील होळकर क्रिकेट स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध आपला पहिला सामना खेळेल, तर बांगलादेशचा सामना दुसऱ्या दिवशी कोलंबोमध्ये पाकिस्तानशी होईल. २०२२ चा उपविजेता इंग्लंड ३ ऑक्टोबर रोजी दक्षिण आफ्रिकेचा सामना करतील.

२६ ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या साखळी फेरीतील शेवटच्या दिवशी दोन सामने होतील ज्यामध्ये इंग्लंडचा सामना गुवाहाटीमध्ये न्यूझीलंडशी होईल आणि भारताचा संघ बंगळुरूमध्ये बांगलादेशशी होईल. उपांत्य फेरीचे सामने २९ आणि ३० ऑक्टोबर रोजी होणार आहेत, तर अंतिम सामना २ नोव्हेंबर रोजी होणार आहे. साखळी फेरीतील अव्वल चार संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. पहिल्या क्रमांकाचा संघ चौथ्या क्रमांकावर आणि दुसऱ्या क्रमांकाचा संघ तिसऱ्या क्रमांकावर खेळेल.

Full schedule of Women’s ODI World Cup 2025
  • मंगळवार, ३० सप्टेंबर - भारत विरुद्ध श्रीलंका - बंगळुरू - दुपारी ३

  • बुधवार, १ ऑक्टोबर - ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड - इंदूर - दुपारी ३

  • गुरुवार, २ ऑक्टोबर - बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान - कोलंबो - दुपारी ३ वाजता

  • शुक्रवार, ३ ऑक्टोबर - इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका - बंगळुरू - दुपारी ३

  • शनिवार, ४ ऑक्टोबर - ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका - कोलंबो - दुपारी ३

  • रविवार, ५ ऑक्टोबर - भारत विरुद्ध पाकिस्तान - कोलंबो - दुपारी ३ वाजता

  • सोमवार, ६ ऑक्टोबर - न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका - इंदूर - दुपारी ३

  • मंगळवार, ७ ऑक्टोबर - इंग्लंड विरुद्ध बांगलादेश - गुवाहाटी - दुपारी ३

  • बुधवार, ८ ऑक्टोबर - ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान - कोलंबो - दुपारी ३ वाजता

  • गुरुवार, ९ ऑक्टोबर - भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका - विशाखापट्टणम - दुपारी ३

  • शुक्रवार, १० ऑक्टोबर - न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश - विशाखापट्टणम - दुपारी ३

  • शनिवार, ११ ऑक्टोबर - इंग्लंड विरुद्ध श्रीलंका - गुवाहाटी - दुपारी ३

  • रविवार, १२ ऑक्टोबर - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया - विशाखापट्टणम - दुपारी ३

  • सोमवार, १३ ऑक्टोबर - दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश - विझाग - दुपारी ३

  • मंगळवार, १४ ऑक्टोबर - न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका - कोलंबो - दुपारी ३

  • बुधवार, १५ ऑक्टोबर - इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान - कोलंबो - दुपारी ३

  • गुरुवार, १६ ऑक्टोबर - ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश - विशाखापट्टणम - दुपारी ३

  • शुक्रवार, १७ ऑक्टोबर - दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका - कोलंबो - दुपारी ३

  • शनिवार, १८ ऑक्टोबर - न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान - कोलंबो - दुपारी ३

  • रविवार, १९ ऑक्टोबर - भारत विरुद्ध इंग्लंड - इंदूर - दुपारी ३

  • सोमवार, २० ऑक्टोबर - श्रीलंका विरुद्ध बांगलादेश - कोलंबो - दुपारी ३

  • मंगळवार, २१ ऑक्टोबर - दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान - कोलंबो - दुपारी ३

  • बुधवार, २२ ऑक्टोबर - ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड - इंदूर - दुपारी ३

  • गुरुवार, २३ ऑक्टोबर - भारत विरुद्ध न्यूझीलंड - गुवाहाटी - दुपारी ३

  • शुक्रवार, २४ ऑक्टोबर - पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका - कोलंबो - दुपारी ३

  • शनिवार, २५ ऑक्टोबर - ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका - इंदूर - दुपारी ३

  • रविवार, २६ ऑक्टोबर - इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड - गुवाहाटी - सकाळी ११

  • रविवार, २६ ऑक्टोबर - भारत विरुद्ध बांगलादेश - बंगळुरू - दुपारी ३

  • बुधवार, २९ ऑक्टोबर—उपांत्यपूर्व पहिला सामना गुवाहाटी/कोलंबो—दुपारी ३

  • गुरुवार, ३० ऑक्टोबर—उपांत्य फेरीचा दुसरा सामना—बंगळुरू—दुपारी ३ वाजता

  • रविवार, २ नोव्हेंबर—अंतिम फेरी—कोलंबो/बंगळुरू—दुपारी ३ वाजता

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.