मुंबई : भारतीय शेअर बाजारात सुरुवातीच्या घसरणीनंतर दुपारच्या सत्रात तेजी पाहायला मिळाली.सेन्सेक्स आणि निफ्टी 50 मध्ये तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स 677.55 अंकांनी म्हणजेच 0.84 टक्क्यांनी वाढला. तर, निफ्टी 50 निर्देशांकात 227.90 अंकांची वाढ झाली. आज (16 जून) शेअर बाजारात Infibeam Avenues या स्टॉकमध्ये तेजी पाहायला मिळाली. कंपनीनं त्यांच्या काही अधिकारांसदर्भातील माहिती सेबीसोबत शेअर केल्यानंतर शेअरमध्ये 5.13 टक्क्यांपर्यंत तेजी पाहायला मिळाली. स्टॉक 22.95 रुपयांपर्यंत पोहोचला होता. बाजार बंद झाला तेव्हा स्टॉक 22.60 रुपयांवर बंद झाला.
कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या Rights Issue Committee ची बैठक 19 जून 2025 रोजी होणार आहे. या बैठकीत अधिकारांसदर्भातील प्रश्नासंदर्भात काही महत्त्वाच्या गोष्टी ठरणार आहेत. रेकॉर्ड डेट, शेअर किंमत, इनटायटलमेंट रेशो आणि इतर अटी, कंपनीनं सेबीकडे केलेल्या फायलिंगमध्ये म्हटलं की 19 जूनला होणाऱ्या बैठकीत राइट्स इश्यूची किंमत, रेकॉर्ड डेट, यासह अन्य विषयांवर चर्चा केली जाणार आहे.
यापूर्वी कंपनीनं 9 जून 2025 ला कंपनीच्या राइटस इश्यू कमिटीनं ड्राफ्ट लेटर ऑफ ऑफरला मंजुरी दिली होती. त्यानंतर बीएसई आणि एनएसईकडे ते पाठवण्यात आलंहोतं. 9 मे 2025 ला कंपनीला 1 रुपयांच्या दर्शनी मूल्याच्या इक्विटी शेअरद्वारे 700 कोटी रुपयांची उभारणी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती. ही रक्कम राइटस इशूद्वारे उभी केली जाईल.
Infibeam Avenues च्या कामगिरी तेजी आणि घसरण पाहायला मिळाली आहे. एका महिन्यात स्टॉकमध्ये 20 टक्के तेजी पाहायला मिळाली आहे. तर, 3 महिन्यात 26 टक्के तेजी पाहायला मिळाली आहे. मात्र, या वर्षाच्या सुरुवातीपासून शेअरची कामगिरी पाहिली असता 13 टक्के घसरण झाली आहे. गेल्या एक वर्षात शेअरमध्ये 27 टक्के घसरण झाली आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करता या स्टॉकमध्ये गेल्या 2 वर्षात 55 टक्के आणि 5 वर्षात 85 टक्के तेजी पाहायला मिळाली आहे.
आज दुपारी Infibeam Avenues चा शेअर 3.53 टक्क्यांच्या तेजीसह 22.60 रुपयांवर ट्रेड करत होता. आता सर्वांच्या नजरा 19 जूनच्या बैठकीकडे लागल्या आहेत. गुंतवणूकदारांना राइटस इश्यूमध्ये काय ऑफर मिळतात याकडे सर्वांचं लक्ष आहे. जर अटी चांगल्या आणि आकर्षक असतील तर येत्या काही दिवसात स्टॉकमध्ये तेजी पाहायला मिळू शकते.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
आणखी वाचा