तळेगाव दाभाडे, ता. १६ ः इंदायणी नदीवरील कुंडमळा येथील लोखंडी साकव कोसळल्याची दुर्घटना रविवारी घडली होती. त्यातील जखमींवर तळेगाव दाभाडे व सोमाटणे येथील वेगवेगळ्या रुग्णालयांत ४१ जणांवर उपचार सुरू आहेत. त्यातील २४ जणांना सोमवारी घरी सोडण्यात आले.
तळेगाव येथील मायमर रुग्णालयात २० जणांवर उपचार सुरू होते. त्यातील १८ जणांना घरी सोडले. दोघांवर उपचार सुरू आहेत. खासगी रुग्णालयात १७ जण दाखल होते. त्यातील सात जण अतिदक्षता विभागात तर चौघे सामान्य कक्षात उपचार घेत आहेत. सहा जणांना घरी सोडले आहे. सोमाटणे येथील खासगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दोन आणि जनरल वॉर्डात दोन अशा चार जणांवर उपचार सुरू आहेत.
‘‘कुंडमळा दुर्घटनेतील जखमीपैकी सात जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. चार जण जनरल वॉर्डात आहेत. सर्व जखमींची प्रकृती चांगली आहे. जखमीपैकी सहा जणांना घरी सोडले आहे.
- डॉ. अजित माने, तळेगाव दाभाडे
‘‘मायमर रुग्णालयात २० जखमी दाखल होते. उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याने १८ जणांना घरी सोडले आहे. दोन जण अतिदक्षता विभागात असून त्यांची प्रकृती व्यवस्थित आहे.
- डॉ. नितीन गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक, मायमर रुग्णालय, तळेगाव दाभाडे
---