आईशप्पत! 'मी छत्तीस नखरेवाली' गाण्यावर महिलांचा जबरदस्त डान्स; व्हिडिओ पाहून सर्वच झाले फिदा
Saam TV June 17, 2025 02:45 PM

सध्या सोशल मीडियावर एक धमाकेदार व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. "मी छत्तीस नखरेवाली" या लोकप्रिय मराठी गाण्यावर काही महिलांनी दिलखुलासपणे डान्स करत धमाल केली आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील हसू, उत्साह, आणि नृत्याची स्टाइल पाहून नेटिझन्स मंत्रमुग्ध झाले आहेत.

हा (Video) पाहून लक्षात येते की, नृत्य हा केवळ तरुणांचा प्रांत नाही, तर सर्व वयोगटातील लोकांचा आनंदाचा माध्यम आहे. "मी छत्तीस नखरेवाली" हे गाणं आधीपासूनच मराठी प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. यामध्ये एक खास मराठमोळा ठसा असून गाण्याच्या तालावर थिरकायला कोणीही मागे राहत नाही.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या इन्स्टाग्रामवर या महिलांचे आधीही अनेक डान्सचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. आताचाही हा डान्स व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील mansi.gawande.73 या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. काही तासांतच हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळालेल्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियाचा वर्षाव केलेला आहे.

प्रतिक्रियाचा वर्षाव

''मस्त (Dance) खुपच छान एकदम सुंदर दिसत आहेत सगळ्याजणी'' अशी प्रतिक्रिया एका यूजरने केली आहे तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''खूप छान साडी आहे आणि सगळ्यांचा डान्स पणं छान आहे'' तिसऱ्या यूजरने म्हटलं,'' अशाच प्रकारे रील्स व्हिडिओ बनवता जावा'' अशा अनेक कौतुकास्पद प्रतिक्रिया आल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.