१७ जून २०२५ साठी मंगळवार : ज्येष्ठ कृष्ण ६, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय ५.४२, सूर्यास्त ७.१३, चंद्रोदय रात्री ११.५४, चंद्रास्त सकाळी ११, भारतीय सौर ज्येष्ठ २७ शके १९४७.
दिनविशेष१९९१ : भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल आणि दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर.
२००८ : पृथ्वीसारखे, परंतु आकाराने प्रचंड असलेले तीन नवे ग्रह आणि दोन नव्या सौरमाला सापडल्याचे युरोपातील शास्त्रज्ञांनी जाहीर केले. नव्या ग्रहांत एक ग्रह पृथ्वीपेक्षा ४.२ पट, दुसरा ६.७ पट आणि तिसरा ग्रह ९.४ पट मोठा आहे.