Latest Maharashtra News Updates : पुढील दोन दिवसांत मॉन्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज
esakal June 17, 2025 05:45 PM
Khanapur Police : खानापुरातील प्रशिक्षण केंद्रातील वीस पोलिसांना विषबाधा

खानापूर : पोलिस प्रशिक्षण केंद्रामध्ये वीसहून अधिक पोलिसांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. प्रशिक्षण केंद्रामध्ये विविध भागातील पोलिस आहेत. रविवारी सुटी असल्याने ते जेवण करण्यासाठी बाहेर गेले होते. काही जणांनी इतर ठिकाणी जेवण केले. काही जणांनी आपल्या घरच्या डब्यातून जेवण आणले होते. मात्र, रविवारी रात्री काही जणांना जुलाब-उलटी, ताप व डोकेदुखी सुरू झाली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांना खानापूर येथील शासकीय रुग्णालयात सोमवारी सकाळी दाखल केले.

PM Modi : G-7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी पोहोचले कॅनडाला

पंतप्रधान नरेंद्र मोदी ५१ व्या जी-७ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी कॅनडाला पोहोचले आहेत. अल्बर्टाच्या कनाकास्किस येथे जी-७ शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. कॅनडाच्या कॅलगरी येथे पोहोचलेले पंतप्रधान मोदी लवकरच कनाकास्किसला जाणार आहेत.

Kolhapur Boundary Extension : कोल्हापूर हद्दवाढविरोधात आज वीस गावांत बंद

कोल्हापूर : हद्दवाढीसंदर्भात पालकमंत्री प्रकाश आबिटकर व वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील आमदार व खासदार यांची उद्या (ता. १७) मुंबईत बैठक होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत नागरिकांच्या भावना पोहोचाव्यात. यासाठी मंगळवारी (ता. १७) प्रस्तावित हद्दवाढीतील वीस गावांत बंद पाळण्यात येणार असल्याची माहिती सर्वपक्षीय हद्दवाढ विरोधी समितीचे अध्यक्ष व उचगावचे सरपंच मधुकर चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Savarkar Madnaik : सावकार मादनाईक भाजपच्या वाटेवर, मुख्यमंत्र्यांबरोबर लवकरच होणार बैठक

जयसिंगपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सावकार मादनाईक यांच्या भाजप प्रवेशाच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. मादनाईक यांच्या रूपाने भाजपला शेतकरी चळवळीच्या मुशीत तयार झालेले नेतृत्व मिळणार आहे. शिवाय आगामी विधानसभा निवडणुकीत पक्ष चिन्हावर निवडणूक लढविणारे ते प्रबळ दावेदार ठरणार आहेत.

Sant Namdev Maharaj Palkhi : संत नामदेव महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

हिंगोली : ‘जय जय राम कृष्ण हरी’च्या गजरात संत नामदेव महाराजांच्या पालखी सोहळ्याचे नरसी नामदेव (ता. हिंगोली) येथून सोमवारी दुपारी पंढरपूरकडे प्रस्थान झाले. या पालखी सोहळ्यात शेकडो वारकरी सहभागी झाले आहेत. परभणी आषाढी वारीसाठी श्रीक्षेत्र पंढरपूरकडे निघालेल्या संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आज शहरात स्वागत करण्यात आले. शहरातील अनेक भागांत भजन, सप्ताहाचे आयोजन केले होते.

Monsoon Update : पुढील दोन दिवसांत मॉन्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

पुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) तब्बल तीन आठवड्याची विश्रांती घेतल्यानंतर पुढील प्रवास पुन्हा सुरू केला आहे. आज मॉन्सूनने संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा व्यापून विदर्भाच्या आणखी काही भागात प्रगती केली आहे. पुढील दोन दिवसांत मॉन्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. सोमवारी (ता. १६) मॉन्सूनने पुन्हा सक्रिय होत विदर्भाचा उत्तर भाग वगळता उर्वरित महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेशचा काही भाग, छत्तीसगड, ओडिशाच्या आणखी काही भागात प्रगती केली आहे.

Jayashree Patil : काँग्रेसमधून निलंबित केलेल्या नेत्या जयश्री पाटील यांचा उद्या मुंबईत भाजप प्रवेश

Latest Marathi Live Updates 17 June 2025 : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा आणि काँग्रेसमधून निलंबित केलेल्या नेत्या जयश्री पाटील यांनी अखेर भाजपमधील प्रवेशावर शिक्कामोर्तब केलं. याबाबतची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित करण्यात आली. तसेच कोल्हापूर जिल्ह्यात रविवारपासून सुरू असलेल्या दमदार पावसाने आजही जोरदार हजेरी लावली. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत रविवारी रात्री नऊ ते सोमवारी रात्री नऊ या चोवीस तासांत नऊ फूट आठ इंचांनी वाढ झाली. नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) तब्बल तीन आठवड्याची विश्रांती घेतल्यानंतर पुढील प्रवास पुन्हा सुरू केला आहे. मॉन्सूनने संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा व्यापून विदर्भाच्या आणखी काही भागात प्रगती केली आहे. पुढील दोन दिवसांत मॉन्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. फेसबुकवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध अपमानास्पद पोस्ट टाकणाऱ्या हदीमनी यांना अटक करण्याची मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते एन. रविकुमार यांनी केली. ‘जय जय राम कृष्ण हरी’च्या गजरात संत नामदेव महाराजांच्या पालखी सोहळ्याचे नरसी नामदेव (ता. हिंगोली) येथून सोमवारी दुपारी पंढरपूरकडे प्रस्थान झाले. या पालखी सोहळ्यात शेकडो वारकरी सहभागी झाले आहेत. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.