Chandrashekhar Bawankule arrived late for Sudhakar Badgujar’s BJP entry
Marathi June 17, 2025 09:24 PM


सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल कुठलीही माहिती माझ्याकडे नाही, असे वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले होते. यानंतर ते सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशालाही दीड तास उशीरा पोहचले. त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशामुळे नाराज आहेत का? अशी चर्चा रंगली आहे.

मुंबई : ज्येष्ठ नेते सुधाकर बडगुजर यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीच्या दोन दिवसांनंतर शिवसेना ठाकरे पक्षाने सुधाकर बडगुजर यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत हकालपट्टी केली होती. पक्षाकडून झालेल्या कारवाईमुळे सुधाकर बडगुजर नाराज झाले होते. त्यानंतर ते भाजपात प्रवेश करतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. मात्र नाशिकमधील भाजपा आमदार सीमा हिरे यांनी सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला जोरदार विरोध केला. असे असले आज (17 जून) सुधाकर बडगुजर यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसोबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन आणि रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. (Chandrashekhar Bawankule arrived late for Sudhakar Badgujar’s BJP entry)

सुधाकर बडगुजर यांनी भाजपात प्रवेश केला असला तरी त्यांच्या पक्षप्रवेशामुळे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. कारण चंद्रशेखर बावनकुळे प्रदेश दौऱ्यावर असताना त्यांच्या कसिनोचा फोटो सुधाकर बडगुजर यांनी व्हायरल केला होता. यानंतर विरोधकांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जोरदार टीका केली होती. अशातच आज सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबाबत मला माहिती नसल्याचे वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सकाळी नागपूर येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना केले. त्यांनी म्हटले की, सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल कुठलीही माहिती माझ्याकडे नाही. जोपर्यंत स्थानिक टीम असते, पदाधिकारी, खासदार, आमदार त्यांच्याशी सल्लामसलत एकमत झाल्याशिवाय आमच्याकडे पक्षप्रवेश होत नाही. आमच्याकडे बडगुजरांच्या पक्षप्रवेशाला स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विरोध आहे. त्यामुळे सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल मला कुठलीही माहिती नाही, असे वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले होते.

हेही वाचा – Ajit Pawar : शरद पवारांकडून एकत्र येण्याच्या चर्चांना पूर्णविराम; अजितदादांची एका वाक्यात प्रतिक्रिया

चंद्रशेखर बावनकुळे खरंच नाराज?

सुधाकर बडगुजर यांचा पक्षप्रवेश आज दुपारी 2 वाजता होणार होता. मात्र चंद्रशेखर बावनकुळे आलेच नाहीत. गिरीश महाजन यांनी वारंवार फोन केल्यावर चंद्रशेखर बावनकुळे दुपारी 3.30 वाजता आले. मात्र तोपर्यंत सुधाकर बडगुजर यांना पक्षप्रवेशासाठी ताटकळत राहावे लागले. एवढेच नाहीतर चंद्रशेखर बावनकुळे हे प्रदेशाध्यक्ष असतानाही सुधाकर बडगुजर यांचा भाजपात पक्षप्रवेश रवींद्र चव्हाण यांनी केला. त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे सुधाकर बावनकुळे यांच्या पक्षप्रवेशामुळे खरंच नाराज आहेत का? हे येणाऱ्या काळात समोर येईल.

हेही वाचा – Sanjay Raut : धीरूभाईंच्या मागे ईडी लागली नव्हती, अजित पवारांच्या कथित विधानाचा राऊतांनी घेतला समाचार



Source link

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.