Dada Bhuse explanation regarding language compulsion says Marathi is mandatory across Maharashtra, not Hindi
Marathi June 18, 2025 04:25 PM


राज्यभरात नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. नव्या शैक्षणिक धोरणानुसार महाराष्ट्रात त्रिभाषी सूत्र अनिवार्य करण्यात आले. पण या धोरणामध्ये हिंदी भाषा शिकण्याची सक्ती करण्यात आली. पण महाराष्ट्रात हिंदी भाषेची सक्ती नको, असे म्हणत पालकांनी, शिक्षक संघटनांनी आणि राजकीय पक्षांनी सरकारला विरोध केला.

मुंबई : राज्यभरात नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. नव्या शैक्षणिक धोरणानुसार महाराष्ट्रात त्रिभाषी सूत्र अनिवार्य करण्यात आले. पण या धोरणामध्ये हिंदी भाषा शिकण्याची सक्ती करण्यात आली. पण महाराष्ट्रात हिंदी भाषेची सक्ती नको, असे म्हणत पालकांनी, शिक्षक संघटनांनी आणि राजकीय पक्षांनी सरकारला विरोध केला. त्यानंतर आता या त्रिसूत्री धोरणात राज्य सरकारने बदल करत हिंदी ही सर्वसाधारणपणे तृतीय भाषा असेल, असे जाहीर केले आहे. पण यासाठीही आता विरोध होऊ लागला आहे. कारण महाराष्ट्रात प्रामुख्याने मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांना मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तीन भाषांचे शिक्षण दिले जाते.

पण सरकारने आता अनिवार्य नाही पण सर्वसाधारणपणे हिंदी तृतीय भाषा असल्याचे जाहीर करत यामध्ये नेमका कोणता बदल केला? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. तर याचबाबत आता शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. राज्यात हिंदी नाही तर मराठी भाषा सर्व माध्यमांच्या शाळांना अनिवार्य असल्याचे भुसे यांनी म्हटले आहे. तर, महाराष्ट्रातील विद्यार्थी पाठीमागे राहू नये यासाठी त्रिभाषा सूत्र राबविले जात आहे, असेही यावेळी दादा भुसे यांच्याकडून सांगण्यात आले. बुधवारी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेली ते बोलत होते. (Dada Bhuse explanation regarding language compulsion says Marathi is mandatory across Maharashtra, not Hindi)

हेही वाचा… Education Policy : हिंदी अनिवार्य नाही, पण शिकावीच लागणार; राज्य सरकारचे नवे शिक्षण धोरण

प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मंत्री दादा भुसे यांनी हिंदी भाषा ही सर्वसाधारणपणे तृतीय भाषा असेल, याबाबत स्पष्टीकरण देताना म्हटले की, राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा बंधनकारक असणार आहे. इयत्ता पाचवीपासून हिंदी विषय आहे. तो बऱ्याच वर्षांपासून शिकविला जात आहे. इतर माध्यमांच्या शाळेत त्यांची भाषा, मराठी भाषा, इंग्रजी तिसरी भाषा असणार आहे. काल पहिली ते चौथीसाठी जो शासन निर्णय आला आहे, त्यात कुठेही ‘अनिवार्य’ शब्द नाही. त्यामुळे हिंदी विषय घ्यायचा का नाही हे विद्यार्थी ठरवतील. तसेच, विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार तिसरी भाषा शिकवली जाणार आहे. ते नियोजन करताना त्या वर्गातील किमान 20 विद्यार्थ्यांनी मागणी केली तर शिक्षक उपलब्ध करून दिले जातील. पण एखादं दुसरा विद्यार्थी असेल तर त्यांच्यासाठी ऑनलाइन पर्याय किंवा अन्याय पर्याय उपलब्ध करून देऊन ती भाषा शिकवली जाणार असल्याचे दादा भुसे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.



Source link

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.