मल्टीबॅगर स्टॉक: आरबीआयने (RBI) अलिकडेच रेपो रेटमध्ये कपात केल्यानंतर, जवळजवळ सर्व सार्वजनिक क्षेत्रातील आणि खासगी क्षेत्रातील बँकांनी व्याजदरात कपात केली आहे. म्हणजेच, आता बचतीपासून ते फिक्स्ड अकाउंटपर्यंत, पूर्वीसारखे परतावे मिळत नाहीत. अशा परिस्थितीत, लोक शेअर बाजाराकडे अधिक गुंतवणू करत असल्याचे दिसत आहे. परंतू, शेअर बाजाराचे (Share market) स्वतःचे धोके आणि त्याचे फायदे देखील आहेत. आज आपण मल्टीबॅगर स्टॉकबद्दल माहिती पाहणार आहोत. या शेअरने चमत्कार केला आहे. या स्टॉकमध्ये गुंतवणूक करणारे लोक करोडपती झाले आहेत. ईस्ट इंडिया ड्रम्स अँड बॅरल्स मॅन्युफॅक्चरिंग लिमिटेडच्या ( East India Drums and Barrels Manufacturing Limited) शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे.
पाच वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअरची किंमत 20 पैसे होती, परंतु आज ती 71.62 रुपये झाली आहे. म्हणजेच, गेल्या पाच वर्षांत, ईस्ट इंडिया ड्रम्स अँड बॅरल्सच्या शेअरने 35000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. जर कोणी पाच वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये कोणी जर एक लाख रुपये गुंतवले असतील तर त्याचे आज ते 3.5 कोटींहून अधिक झाले असतील. बीएसईनुसार, रसायन, तेल आणि इतर उद्योगांसाठी बॅरल्स आणि मोठे ड्रम तयार करणाऱ्या ईस्ट इंडिया ड्रम्स अँड बॅरल्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचे मार्केट कॅप 105.81 कोटी रुपये आहे आणि ते दरवर्षी 23 लाखांहून अधिक ड्रम तयार करते.
जर आपण या कंपनीच्या स्टॉकच्या एका वर्षात परताव्याबद्दल बोललो तर त्याने सुमारे 2000 टक्के जबरदस्त परतावा दिला आहे. म्हणजेच, जर एखाद्याने एका वर्षापूर्वी एक लाख रुपये गुंतवले असते तर आता त्याला 20 लाख रुपये मिळाले असते. गेल्या वर्षी जून महिन्यात या स्टॉकची किंमत 33.40 रुपये होती, सहा महिन्यांत ती सुमारे 72 रुपये झाली, तर एका वर्षानंतर ती आता 71.62 रुपये झाली आहे.
आणखी वाचा