तेलंगाणातील बेगमपेट विमानतळ बॉम्बने उडवून देण्यची धमकी देण्यात आली आहे, बेगमपेटचे एसीपींनी सांगितले की, "आज सकाळी बेगमपेट विमानतळाला बॉम्बची धमकी देणारा मेल मिळाला. आम्ही सध्या बॉम्ब शोधक पथकासह विमानतळ आणि त्याच्या परिसराची कसून तपासणी करत आहोत. अधिक माहिती नंतर दिली जाईल."
Wari 2025 LiveUpdate: देहूतून तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थानआज देहूतून तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. लाखो वारकरी यामध्ये सहभागी झाले आहेत.
Mumbai Live Update:राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसे शिष्टामंडळ विद्यालयात दाखलराज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसे शिष्टामंडळ दादरच्या साने गुरुजी विद्यालयात दाखल झाले आहेत.
Indian Army Live Update: भारतीय नौदलाला मिळणार आणखी बळकटी, आज विशाखापट्टणम इथं आयएनएस अर्नाळा भारतीय नौदलात होणार दाखलभारतीय नौदलाला मिळणार आणखी बळकटी, आज विशाखापट्टणम इथं आयएनएस अर्नाळा भारतीय नौदलात दाखल होणार आहे.
Kedarnath Live Update: केदारनाथमध्ये भूस्खलन , २ जणांचा मृत्यूकेदारनाथमध्ये भूस्खलन झाल्याने २ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
MNS Live Updates: मनसे आक्रमक, हिंदी सक्तीविरोधात पुस्तक जाळून निषेधमराठी भाषा आणि संस्कृतीच्या मुद्द्यावर नेहमीच आग्रही भूमिका घेणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. हिंदी भाषेची अनावश्यक सक्ती केली जात असल्याचा आरोप करत, मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत हिंदी पुस्तकं जाळून आपला तीव्र निषेध नोंदवला.
Saint Tukaram Maharaj Palakhi Live Updates: संत तुकाराम महाराजांच्या पादुका दर्शनासाठी मंदिरातसंत तुकाराम महाराजांच्या पादुका दर्शनासाठी मंदिरात आल्या आहेत पूजा झाल्यानंतर दर्शनासाठी पादुका मंदिरात आणण्यात आल्यात. काही वेळात पूजेला सुरुवात होईल.
पादुकांनी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या बाहेर पादुका पडल्या.
Raj Thackeray Live : गुजरातमध्ये हिंदी सक्ती नाही, मग महाराष्ट्रात का लादता? राज ठाकरेंचा सवालराज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत सांगितले की गुजरात सारख्या राज्यात हिंदी लादलेली नाही तर मग महाराष्ट्रात का लादली जात आहे. असा सवाल करत म्हणाले की शाळांमध्ये हिंदी कशी शिकवली जाते तेच पाहतो असा इशाराही त्यांनी यावेळी दिली.
Raj Thackeray Live : हिंदी भाषा लादून सुसंस्कृत महाराष्ट्र काबीज करण्याचा डाव : राज ठाकरेएका राज्याची भाषा आमच्या राज्यातील कोवळ्या मुलांवरती लादण्याचा का प्रयत्न का करताय हा सवाल राज ठाकरे यांनी केला, ते म्हणाले की, हिंदी भाषा लादून सुसंस्कृत महाराष्ट्र काबीज करण्याचा डाव आहे आपण ओळखले पाहिजे.
Mumbai Live : राज ठाकरेंची थोड्याच वेळात पत्रकार परिषदराज ठाकरे यांनी तातडीची पत्रकार परिषद बोलावल असून यात ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Mumbai Local : मुंबईत लोकलसेवेचा खोळंबा, हार्बरच्या गाड्या २० मिनिटे उशिरामुंबईसह उपनगरात सकाळपासून काही भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे हार्बरवरील लोकल वाहतूक विस्कळीत झाली असून गाड्या उशिराने धावत आहेत. सकाळी कामावर जाण्याच्या वेळेत लोकलचा खोळंबा झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. हार्बर लाइनवर स्थानकांमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे.
Dehu : उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शनउपमुख्यमंत्री अजित पवार संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेणार आहेत. तुकोबारांयांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यापूर्वी अजित पवार हे देहूत दाखल झाले आहेत. पालखी सोहळ्याचा आढावा घेतल्यानंतर ते बारामतीला रवाना होतील.
Mumbai Rain : मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाची हजेरीमुंबईत काही भागात मुसळधार पाऊस पडत आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवलीत जोरदार पावसानं हजेरी लावलीय. तर काही भागात ढगाळ वातावरण असून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची बदनामी केल्याप्रकरणी लय भारी यूट्यूब चैनल चे पत्रकार तुषार खरात यांना पोलिसांनी विविध गुन्ह्यामध्ये अटक केली होती या प्रकरणात 102 दिवसांच्या कारावासानंतर पत्रकार तुषार खरात यांची वडूज सत्र न्यायालयाने जामीनावर सुटका केली आहे. ॲट्रॉसिटी, विनयभंग,खंडणी अशा गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी अटक केली होती. कारागृहामध्ये असताना त्यांनी अन्न त्याग आंदोलन देखील केले होते..
War Live : इराण इस्त्रायल युद्धाला अधिकृत सुरुवात इराणकडून घोषणाइराण इस्त्रायल युद्धाला अधिकृत सुरुवात झाली आहे. इराणने यासंदर्भातील घोषणा केली आहे. रात्री इराणकडून इस्त्रायलच्या काही ठिकाणांवर हल्ले करण्यात आले.
KDMC Election Live : निवडणुकीच्या तोंडावर 27 गावांचा प्रश्न ऐरणीवरनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण जोडी 27 गावांच्या प्रश्न ऐरणीवर आला आहे . एकीकडे 27 गाव संघर्ष समितीकडून या 27 गावांचे स्वतंत्र नगरपालिका करण्याचे मागनी पुन्हा एकदा केली जाते तर दुसरीकडे 27 गावे केडीएमसीतच राहावीत यासाठी न्यायालयात याचिका दाखल करणारे संदीप पाटील यांनी 27 गावे आता निघणार नाहीत असे मत ठामपणे व्यक्त केलंय . त्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेचा निवडणुका या 27 गावासहहोतात की 27 गाव वगळून होतात याकडे आता सर्वांचेच जास्त लक्ष लागलं आहे.
Mumbai Live : मुंबई गोवा महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर खड्डेमुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करीत असताना पुन्हा खड्डयांचा त्रास सहन करवा लागत आहे. मुंबई गोवा महामार्गाचे बऱ्याचअंशी काँक्रिटीकरण पुर्ण झाले असले तरी माणगाव, रोहा आणि पेण परिसरात उड्डाण पुलांची काम अपूर्ण आहेत. यादरम्यान तयार केलेल्या सर्व्हिस रोडची पावसाचे पाणी साचुन पार दुरावास्था झाली आहे. गडब, नागोठणे आणि लोणेरे येथील या सर्व्हिस रोडवर मोठे खड्डे पडले असून यातुन मार्ग काढताना वाहन चलकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष द्याव अशी मागणी केली जात आहे
Mumbai Live : राज ठाकरेंची आज तातडीची पत्रकार परिषदराज ठाकरे यांनी आज तातडीची पत्रकार परिषद बोलवली आहे. सकाळी ११.३० वाजता ही पत्ररकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. यावेळी राज ठाकरे काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
Former Nipani MLA Kakasaheb Patil Passes Away : निपाणीचे काँग्रेसचे माजी आमदार काकासाहेब पाटील यांचे निधननिपाणी : येथील माजी आमदार काकासाहेब पांडुरंग पाटील (वय ७१) यांचे बेळगाव येथील रुग्णालयात बुधवारी (ता. १८) अल्पशा आजाराने निधन झाले. माजी आमदार काकासाहेब पाटील (Kakasaheb Patil Passes Away) यांची मागील काही दिवसांपासून प्रकृती ठीक नसल्याने त्यांना गेले ४० दिवस बेळगावमधील केएलई रुग्णालयात (KLE Hospital) दाखल करण्यात आले होते.
Sant Tukaram Maharaj Palkhi : जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे देहूतून आज पंढरपूरकडे प्रस्थानदेहू : जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा आषाढी वारी पालखी सोहळा बुधवारी (ता. १८) दुपारी अडीच वाजता देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी या सोहळ्यासोबत जाणारा लाखो वैष्णवांचा मेळा देहू येथे मंगळवारी सायंकाळपर्यंत टप्प्याटप्प्याने दाखल झाला असून टाळ मृदंगाच्या गजराने देहूनगरी दुमदुमली आहे. प्रस्थानानंतर पालखी सोहळा दुसऱ्या दिवशी पंढरपूरकडे मार्गस्थ होतो.
Iran-Iraq Conflict : तेहरानमधून तातडीने बाहेर पडा, केंद्राचे भारतीय विद्यार्थ्यांना निर्देशLatest Marathi Live Updates 18 June 2025 : निपाणी येथील माजी आमदार काकासाहेब पांडुरंग पाटील (वय ७१) यांचे बेळगाव येथील रुग्णालयात आज अल्पशा आजाराने निधन झाले. तसेच जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा आषाढी वारी पालखी सोहळा बुधवारी (ता.१८) दुपारी अडीच वाजता देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. इराण आणि इस्राईल यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला असल्याने भारत सरकारने नव्या मार्गदर्शक सूचना जारी करत इराणची राजधानी तेहरानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांना तेथून बाहेर पडण्यास सांगितले आहे. बंगळूरमधील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेप्रकरणी भाजपने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत जोरदार निदर्शने केली. सोन्याच्या फसवणूकप्रकरणी बंगळूरमधील पहिल्या सीसीएच न्यायालयाने मंगळवारी अभिनेत्री ऐश्वर्या गौडा हिला सशर्त जामीन मंजूर केला. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..