Nitesh Rane and Nilesh Rane : गेल्या काही दिवसांपूर्वी मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी धाराशिव येथील पक्षाच्या मेळाव्यात बोलताना “कोणी कितीही ताकद दाखवली, कोणी कसेही नाचले, तरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच राहतील आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील. लक्षात ठेवा, मुख्यमंत्रीपदावर बसलेला नेता भाजपचाच आहे,” असे वक्तव्य केले होते. यानंतर शिवसेनेचे कुडाळचे आमदार आणि नितेश राणे यांचे बंधू निलेश राणे (Nilesh Rane) यांनी त्यांना उद्देशून एक सल्ला देणारी पोस्ट केली होती. नितेश राणे यांनी त्या पोस्टला उत्तरही दिलं होतं. यामुळे दोन्ही भावांमध्ये जुंपल्याचे पाहायला मिळाले होते. यानंतर आता पुन्हा एकदा राणे बंधूंमध्ये शीतयुद्ध रंगल्याचं पाहायला मिळत आहे.
मंत्री नितेश राणे यांनी ‘एक्स’वर एक पोस्ट करत आमदार निलेश राणे यांना युती धर्माची आठवण करून दिली आहे. नितेश राणे यांनी एका कार्यकर्त्याचा व्हॉट्सॲप चॅटचा स्क्रीनशॉट शेअर करत महायुतीतील कार्यकर्त्यांना धमकावणे अयोग्य असल्याचं मत व्यक्त केलंय.
नितेश राणे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, “आदरणीय निलेशजी, आपणच काही दिवसा अगोदर महायुतीबद्दल बोलला होता. आता असे आपल्याच मित्र पक्षाच्या पदाधिकाऱ्याला धमकावणे बरोबर नाही. शेवटी आपण महायुतीचे घटक आहोत. आपण नोंद घ्याल, अशी अपेक्षा करतो, असे त्यांनी म्हटले आहे. आता नितेश राणे यांच्या पोस्टला निलेश राणे काय प्रत्युत्तर देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री बसलाय सगळ्यांनी लक्षात ठेवा, असे वक्तव्य नितेश राणे यांनी केल्यानंतर निलेश राणे यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करत त्यांना सल्ला दिला होता. नितेश ने जपून बोलावे… मी भेटल्यावर बोलेननच पण आपण बोलताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवून बोललं पाहिजे. सभेत बोलणं सोपं आहे. पण आपल्या बोलण्यामुळे आपण नेमकं कोणाचा फायदा करतोय याचं भान असलं पाहिजे. आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही, असे त्यांनी म्हटले होते. निलेश राणे यांनी ही पोस्ट केल्यानंतर नितेश राणे यांनी त्या पोस्टवर मिश्कील प्रतिक्रिया दिली होती. निलेशजी तुम्ही tax free आहात, असे त्यांनी म्हटले होते. यानंतर काही वेळाने निलेश राणे यांच्याकडून पोस्ट डिलिट करण्यात आली होती.
https://www.youtube.com/watch?v=38xd7o9uh38
आणखी वाचा
आणखी वाचा