Housefull 5 Box Office Collection : अक्षय कुमार अन् अजय देवगणमध्ये कांटे की टक्कर, 'हाऊसफुल ५' लवकरच मोडणार 'रेड २'चा रेकॉर्ड
Saam TV June 19, 2025 12:45 PM

अक्षय कुमार (Akshay Kumar) , रितेश देशमुख आणि अभिषेक बच्चन यांचा फुल कॉमेडी चित्रपट 'हाऊसफुल 5' (Housefull 5) सध्या बॉक्स ऑफिसवर गाजत आहे. या चित्रपट आजही कोटींचा व्यवसाय करत आहे. 'हाऊसफुल 5' चित्रपट 6 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला आला. चित्रपट रिलीज होऊन आता 13 दिवस पूर्ण झाले आहेत. चित्रपटाने आपले बजेट देखील वसूल केले आहे. 'हाऊसफुल 5'हा 'हाऊसफुल' फ्रँचायझीचा 5 वा भाग आहे. या चित्रपटात फुल कॉमेडी आणि ॲक्शन पाहायला मिळत आहे.

'हाऊसफुल 5' बॉक्स ऑफिसवर कलेक्शन दिवस 13

'5' दोन वेगवगेळ्या क्लायमॅक्ससाठी ओळखला जातो. 'हाऊसफुल 5'ची निर्मिती साजिद नाडियादवाला आणि दिग्दर्शन तरुण मनसुखानी यांनी केले आहे.'हाऊसफुल 5'चा तबल 225 कोटी रुपये होता. मीडिया रिपोर्टनुसार, चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या आठवड्यात 127.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे. आता चित्रपटाने 13व्या दिवशी किती कोटींची कमाई केली जाणून घेऊयात.

  • दिवस पहिला - 24 कोटी रुपये

  • दिवस दुसरा - 31 कोटी रुपये

  • तिसरा दिवस - 32.5 कोटी रुपये

  • चौथा दिवस - 13 कोटी रुपये

  • पाचवा दिवस - 11.25 कोटी रुपये

  • सहावा दिवस - 8.5 कोटी रुपये

  • सातवा दिवस - 7 कोटी रुपये

  • आठवा दिवस - 6 कोटी रुपये

  • नववा दिवस - 9.5 कोटी

  • दहावा दिवस - 11 कोटी रुपये

  • अकरावा दिवस - 4.25 कोटी रुपये

  • बारावा दिवस - 4.12 कोटी रुपये

  • तेरावा दिवस - 3 कोटी रुपये

  • एकूण - 165.25 कोटी रुपये

'हाऊसफुल 5' नवीन इतिहास रचणार

मीडिया रिपोर्टनुसार, 'हाऊसफुल 5'चे 13 दिवसांत एकूण कलेक्शन 165.25 कोटी रुपये झाले आहे. त्यामुळे आता अक्षय कुमारचा 'हाऊसफुल 5' चित्रपट लवकरच अजय देवगणच्या( Ajay Devgn ) 'रेड 2' चित्रपटाला मात देणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार,'रेड 2'ची ( Raid 2 ) एकूण कमाई जवळपास 172.75 कोटी रुपये आहे. त्यामुळे आता 'हाऊसफुल 5'च्या निशाण्यावर अजय देवगण आणि रितेश देशमुखचा 'रेड 2' चित्रपट आहे. 'हाऊसफुल 5' या वीकेंडला किती कमाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.