पंचांग -
गुरुवार : ज्येष्ठ कृष्ण ८, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी मीन, सूर्योदय ५.४२, सूर्यास्त ७.१३, चंद्रोदय उ. रात्री १.०४, चंद्रास्त दुपारी १२.५६, भारतीय सौर ज्येष्ठ २९ शके १९४७.
दिनविशेष -
१९९९ - कलकत्ता आणि बांगलादेशाची राजधानी ढाका दरम्यान थेट बससेवेचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते उद्घाटन.
२०१४ - कृषी क्षेत्रातील ‘नोबेल’ समजला जाणारा जागतिक अन्न पुरस्कार भारतीय वंशाचे ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. संजय राजाराम यांना जाहीर.
२०१५ - ज्येष्ठ शास्त्रज्ञ, भारतरत्न सीएनआर राव यांना जपानचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘ऑर्डर ऑफ द रायझिंग सन, गोल्ड अँड सिल्व्हर स्टार’ प्रदान.