आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याच्या प्रस्थान होणार आहे. या सोहळ्याच्या प्रस्थान वेशत वेळेत बदल करण्यात आला असून रात्री ८ वाजता पालखी प्रस्थान ठेवण्यात येणार आहे. प्रस्थान गुरुवारच्या दिवशी आल्याने आषाढी वारीचे पालखी सोहळा संजीवन समाधी मंदिरात रंगणार असून रात्री ८ वाजता माऊलींची पालखी पंढरीकडे प्रस्थान करेल.
वारकऱ्यांना सतर्कतेचा इशाराआळंदीमधून आज संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचे प्रस्थान होईल. मात्र सकाळपासूनच पावसाचा जोर वाढला आहे. जाधववाडी ल पा तलाव 94.53% इतका भरलेला आहे. हा तलाव द्वारविरहित असल्याने पाऊस व धरणातील येणाऱ्या पाण्यामुळे हा तलाव ओव्हर प्लो होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इंद्रायणी नदीत विसर्ग सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इंद्रायमी काठी असलेल्या मौजे जांबवडे, सुदुंबरे, सुदवडी, देहू - आळंदी ते तुळापूर पर्यंतच्या सर्व नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देत वारकऱ्यांना देकील सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
पावसाचा जोर वाढला, शाळांना सुट्ट्या; रायगड जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णयपहाटेपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. रायगड जिल्हामध्ये पावसाचा जोर सर्वाधिक आहे. हवामान खात्याच्या आतीवृष्टीच्या इशाऱ्यानंतर रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी शाळा कॉलेजला सुट्टी जाहीर केली आहे, तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर सकाळच्या सत्रात भरलेल्या शाळा सोडण्यात आल्या तर दुपारच्या सत्रातील शाळांना सुट्टी देण्यात आली.
Kamal Vyavahare Join Congress : माजी महापौर कमल व्यवहारे यांची घर वापसी, काँग्रेसमध्ये प्रवेशविधानसभेला कसबा विधानसभा मतदारसंघातून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिल्याने काँग्रेसच्या माजी महापौर कमला व्यवहारे यांनी पक्ष सोडला होता, विधानसभा निवडणूक त्या स्वबळावर लढल्या. त्यावेळी त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. मात्र, आता पुन्हा त्यांची घरवापसी झाली आहे. काँग्रेसचे प्रदेशध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ आणि पुणे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. पक्षाचे काही निर्णय चुकले असतील तरी त्यामुळे व्यथित झालेल्या कमल व्यवहार यांना पक्षाने पुन्हा योग्य जबाबदारी देण्याचा आश्वासन दिले आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कमल व्यवहारे यांची घरवापसी महत्त्वाची मानसी जात आहे.
माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्या घरात स्फोटमाजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्या बुलढाणा येथील बंगल्यात मोठा स्फोट झाला आहे. सुदैवाने घरात कोणीही नसल्याने कुठलीही जीवितहानी झालेली नाही. या स्फोटात किचनमधील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. स्फोट झाला तेव्हा शिंगणे कुटुंबीय बाहेरगावी होते. स्फोटाची माहिती मिळताच अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल झाले त्यांनी तत्काळ आगीवर नियंत्रण मिळवले.
मारुती चितमपल्ली यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजलीज्येष्ठ साहित्यिक, पक्षीशास्त्रज्ञ, वन्यजीव अभ्यासक पद्मश्री मारुती चितमपल्ली यांच्या निधनाने साहित्य, पर्यावरण, सामाजिक क्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे. त्यांच्या निधनाने निसर्गाशी संवाद साधण्याची नवी दृष्टी देणारा तपस्वी अरण्यऋषी हरपला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. बुधवारी (ता.18) यांचे निधन झाले.
बँक रात्री अकरा वाजता उघडी, पैसे वाटप केल्याचा रंजन तावरे यांचा आरोपमाळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत सहकार बचाव पॅनलचे रंजन तावरे यांनी गंभीर आरोप केला आहे. बारामती शहरातील आमराई परिसरातील पीडीसीसी बँक ही रात्री अकरा वाजता देखील उघडी होती आणि तेथे कारखान्याच्या निवडणुकीच्या मतदारांच्या यादी देखील सापडल्या आहेत. या बँकेतून पैसे वाटप होत असल्याचा आरोप देखील तावरे यांनी केला आहे.