अमेरिकन उद्योगपती आणि स्पेसेक्सचा मालक इलॉन मस्कला मोठा झटका बसला आहे. कारण टेक्सासमध्ये स्टारशिपच्या इंजिनच्या टेस्टिंग दरम्यान स्टारशिपचा प्रोटोटाईप फाटला आहे. प्लान्ड इग्निशन सिक्वेंसच्या काही क्षण आधी हा स्फोट झाला. यामुळं अंतराळयानाचं मोठं नुकसान झालं आहे. यामुळं आजुबाजुच्या सुविधांवर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे.
टेक्सासच्या स्पेसेक्सच्या स्टारबेस साईटवर स्टारशिपच्या स्टँडर्ड इंजिन इग्निशन चाचणी दरम्यान रात्री उशीरा यामध्ये स्फोट झाला. या स्फोटानं स्टारशिपच्या टेस्ट व्हेईकलला मोठी हानी पोहोचली तसंच स्पेसेक्सला पुन्हा करण्यासाठी निश्चित टाइमलाईनशिवाय सर्व प्रकारच्या अॅक्टिव्हिटिज थांबवणं भाग पाडलं.
एक्सवर कंपनीनं आपलं स्टेटमेंट प्रसिद्ध केलं आहे. यात म्हटलं की, "बुधवारी १८ जूनला सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास १०व्या फ्लाईटची चाचणीची तयारी सुरु असलेल्या स्टारशिपची स्टोरबेस टेस्ट स्टँडवर एक मोठी दुर्घटना घडली. यावेळी संपूर्ण कार्यक्रमासाठी चारही बाजुंनी एक सेफ्टी क्लिअर एरिया बनवण्यात आला होता. तसंच सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत. त्यांच्याकडं लक्ष दिलं जात आहे.
कंपनीनं म्हटलं की, आमची स्टारबेस टीम स्थानिक अधिकाऱ्यांशी मिळून परीक्षणस्थळाला आणि आसपासच्या भागाला सुरक्षित करण्यासाठी सक्रीयपणे काम करत आहे. आजुबाजूच्या रहिवाशांना यामुळं कुठलीही अडचण नाही. तसंच आम्ही आवाहन करतो की, सुरक्षा अभियान सुरु राहण्यापर्यंत लोकांनी त्या भागात जाण्याचा प्रयत्न करु नये.
<डोळा फुटला, हाडं मोडली; रक्तबंबाळ अवस्थेत सापडलेली बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री, कुणी केली ही अवस्था ?>डोळा>दरम्यान, सोशल मीडियावर शेअर केल्या जाणाऱ्या व्हिडिओत मोठा स्फोट झाल्याचं दिसत आहे. या स्फोटानंतर मोठ्या आगीच्या ज्वाळा आणि आजुबाजूचा भागाला त्याचा फटका बसल्याचं दिसत आहे.