मुंबई : षण्मुखानंद सभागृहात पार पडलेल्या वर्धापन दिन सोहळ्यात बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटाचा गद्दार असा उल्लेख केला. तसेच कम ऑन किल मी, हिंमत असेल तर या अंगावर असे उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरेंच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी खिल्ली उडवली आहे. (When Uddhav Thackeray said, “Come on, kill me,” मराठी said, “What kind of beating is this for a dead person?”)
वरळी येथील एन.एस.सी.आय. डोम येथे सुरू असलेल्या शिवसेना शिंदे गटाचा वर्धापन दिन मेळाव्यात बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी भाषणात म्हटले की, कमॉन कील मी. मला वाटतं ते इंग्लिश पिक्चर बघून आले असतील. परंतु मी त्यांना सांगू इच्छितो की, मेलेल्या माणसाला काय मारणार? कारण महाराष्ट्राच्या जनतेनं विधानसभेच्या निवडणुकीत तुमचा मुडदा पाडलेला आहे. वाघाच कातडं पांघरून लांडगा वाघ होत नाही. त्यासाठी वाघाचा काळीज आणि मनगटात जोर लागतो. तो दम शिवसैनिकात आहे. त्यामुळे आमच्या नादाला तुम्ही लागू नका. तुमचा टांगा पलटी घोडं फरार आम्ही केलं आहे. बाळासाहेबांचा आणि आनंद दिघेंचा सच्चा कार्यकर्ता मी आहे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
हेही वाचा – मराठी : बाळासाहेबांनंतर मराठी माणसांसाठी तुम्ही काय केलं? शिंदेंचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल
शिवसेना ठाकरे गटाच्या वर्धापन दिन मेळाव्यात बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, आज तर मी तयारीने उभा आहे. 1992-93 साली जेव्हा दंगल भडकली होती, तेव्हा तुम्हीच रस्त्यावर उतरला होता. तेव्हा एक व्यक्ती बाळासाहेबांकडे आली होती. बाळासाहेब आता बस्स झालं, पुरे झालं, ती व्यक्ती कोण हे मी सांगणार नाही, पण व्यक्ती आज हयात आहे. त्यावेळी मी नाना पाटेकर यांचा प्रहार हा चित्रपट होता. त्यात नाना पाटेकर गुंडासमोर उभे राहून म्हणतात की, कम ऑन किल मी. तसं मी या गद्दारांसमोर उभा राहून म्हणतोय की, कम ऑन किल मी. हिंमत असेल तर या अंगावर. फक्त अंगावर येणार असाल तर एक गोष्ट नक्की करा. अमिताभचा एक चित्रपट होता, ज्यात तो येताना ॲम्ब्युलन्स घेऊन येतो. तसं माझ्या अंगावर येणार असाल तर ॲम्ब्युलन्स घेऊन या. कारण येताना तुम्ही सरळ याल आणि जाताना आडवे होऊन जाल, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी शिवसेना शिंदे गटाला दिला.
हेही वाचा – Uddhav Thackeray : ज्यांना जायचं त्यांना जाऊ द्या; गोंधळ झाल्यावर उद्धव ठाकरेंनी भाषण थांबवलं