Kajol: काजोलची लेक न्यासा करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली...
Saam TV June 20, 2025 07:45 PM

Kajol Says About Nysa Devgn: प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री काजोल सध्या तिच्या आगामी 'माँ' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट लवकरच थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. सध्या स्टार किड्स चित्रपट जगात पदार्पण करताना दिसत आहेत. प्रमोशन दरम्यान या भागात काजोलने तिची मुलगी न्यासा देवगणच्या अभिनयातील रसाबद्दलही बोलली आहे.

न्यासा अभिनयात पाऊल ठेवणार आहे का?

अलिकडेच काजोलने दिलेल्या मुलाखतीत तिच्या मुलीबद्दल सांगितले. अभिनेत्रीला विचारण्यात आले की ती तिच्या मुलीला इतर पालकांप्रमाणे चित्रपटांमध्ये आणण्याचा विचार करत आहे का? या प्रश्नाचे उत्तर देताना ती म्हणाली, 'नाही, मला वाटत नाही की ती असे करेल, तिला चित्रपटांमध्ये रस नाही. मला माझ्या कुटुंबातील सर्व मुले आवडतात आणि त्यांना जे करुन आनंद मिळतो तेच करावे अशी माझी ईच्छा आहे.

Aamir Khan: 'सितारे जमीन पर'च्या स्क्रिनिंगला आमिर खान अन् गर्लफ्रेंड गौरी एकत्र, हातात हात घातले, नेटकरी म्हणाले...

काजोलने मुलांबद्दल हे सांगितले

पुढे काजोल म्हणाली, 'माझ्या मुलांना माझे चित्रपट आवडत नाहीत कारण मला त्यात रडावे लागते आणि त्यांना त्यांच्या आईला पडद्यावर रडताना पाहणे आवडत नाही.' मला रडताना पाहून न्यासा आणि युग खूप घाबरतात. मी त्यांना सांगितले आहे की हे सर्व खोटे आहे पण त्यांना समजत नाही.'

Housefull 5 Box Office Collection: 'हाउसफुल 5' च्या कमाईला ब्रेक लागायला सुरुवात; २०० कोटींचा आकडा पार करणं कठीण
View this post on Instagram

A post shared by Kajol Devgan (@kajol)

चित्रपट कधी प्रदर्शित होणार?

'मां' हा चित्रपट 'शैतान'चा सिक्वेल आहे आणि एक आई आपल्या मुलीला वाईट शक्तींपासून वाचवण्यासाठी काय करु शकते हे दाखवण्यात आले आहे. या चित्रपटाची निर्मिती अजय देवगण, ज्योती देशपांडे आणि जिओ स्टुडिओज यांनी केली आहे. काजोल व्यतिरिक्त, रोनित रॉय, इंद्रनील सेनगुप्ता, जितिन गुलाटी, गोपाल सिंग, सूर्यशिखा दास, यानी भारद्वाज, रूपकथा चक्रवर्ती आणि खेरिन शर्मा हे चित्रपटात सहाय्यक भूमिकांमध्ये दिसतील. हा चित्रपट २७ जून २०२५ रोजी हिंदी, तमिळ, तेलुगू आणि बंगाली भाषेत प्रदर्शित होणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.