IND vs ENG 1st Test: कर्णधार शुभमन गिलवर बंदीची टांगती तलवार! ICC चा मोठा नियम मोडला, इंग्लिश मीडियाने पेटवलंय रान
esakal June 21, 2025 09:45 PM

England media slams Gill for breaking ICC code in Headingley Test भारत आणि इंग्लंड यांच्यातील हेडिंग्ले कसोटीत शानदार शतक झळकावणारा कर्णधार शुभमन गिल वादात अडकला आहे. त्याची चर्चा होण्याचे कारण त्याची मैदानावरील कामगिरी नाही, तर त्याचे काळे मोजे आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्याच्या पहिल्या दिवशी शुभमन गिल काळे मोजे घालून मैदानावर फलंदाजी करण्यासाठी आला होता, जे आयसीसीच्या ड्रेस कोडच्या नियमांविरुद्ध आहे. इंग्लिश मीडियाने हा मुद्दा उचलून धरला आहे आणि त्याच्यावर कारवाई करण्यात यावी असा त्यांचा प्रयत्न असल्याचे दिसतेय.

कसोटी क्रिकेटमध्ये पोशाखांबाबत आयसीसीचे कडक मार्गदर्शक तत्वे आहेत. या नियमांनुसार खेळाडूंना सामन्यादरम्यान फक्त पांढरे, क्रीम किंवा हलके राखाडी रंगाचे मोजे घालावे लागतात. MCC नियम १९.४५ मध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की, या रंगांव्यतिरिक्त, गडद रंगाचे मोजे घालण्यास परवानगी नाही. हा नियम २०२३ मध्ये लागू करण्यात आला आणि तेव्हापासून जवळजवळ सर्व खेळाडू त्याचे पालन करत आहेत.

IND vs ENG 1st Test : रिषभ पंत ड्रेसिंग रूममध्ये येताच KL Rahul ने का जोडले हात? Viral Video मधून मिळतील सर्व उत्तरं

हेडिंग्ले कसोटीच्या पहिल्या दिवशी शुभमन गिलचे मोजे कॅमेऱ्याच्या नजरेतून सुटले नाहीत. तो काळ्या मोजे घालून फलंदाजी करताना दिसला, ज्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आणि प्रश्न उपस्थित झाले की हे नियमांचे उल्लंघन आहे का? यासाठी काही शिक्षा होईल का?

आता या प्रकरणार सामनाधिकारी रिची रिचर्डसन निर्णय घेतील. आयसीसीच्या मार्गदर्शक तत्वांनुसार, कोणत्याही खेळाडूने ड्रेस कोडचे असे उल्लंघन केल्यास तो लेव्हल १ चा गुन्हा मानला जातो. यामध्ये, खेळाडूला सामना शुल्काच्या १०% ते ५०% दंड आकारला जाऊ शकतो आणि त्यासोबतच खेळाडूला डिमेरिट पॉइंट्स देखील दिले जाऊ शकतात.

पण, मॅच रेफरीला असे वाटले की गिलने ही चूक जाणूनबुजून केलेली नाही, तर त्याला फक्त एक इशारा देऊन सोडून दिले जाऊ शकते. साधारणपणे, क्रिकेटमध्ये ड्रेस उल्लंघनासाठी कठोर शिक्षा क्वचितच दिसून येते, परंतु हे उल्लंघन स्वतः कसोटी संघाच्या कर्णधाराने केले आहे, त्यामुळे सर्वांच्या नजरा निर्णयावर खिळल्या आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.