माळेगाव कारखाना अजितदादांनी जिंकावा आणि पुढील वर्षी सपत्नीक पांडुरंगाच्या दर्शनास यावे, हे विठूरायाला साकडे घातले असल्याचे राष्ट्रवादीचे आमदार मिटकरींनी म्हटले आहे. शिवाय, सध्या जी काही राजकीय उलथापालथ होईल, ती पांडुरंगाची मर्जी असेल असं म्हणून मिटकरींनी संभ्रम वाढवलेला आहे.
शेगावकरांना मिळणार 24 तास पाणी; आमदार कुटेंनी घेतली बैठकशेगाव शहराचा सर्वांगीण विकास अंतिम टप्प्यात आहेत. लवकरच या शहरातील सर्व मार्ग हिरवेगार दिसतील, याशिवाय या शहराला दररोज पाणी मिळेल अशी व्यवस्था कार्यान्वित केली जात असल्याची माहिती जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ संजय कुटे यांनी दिली. शेगाव नगरपालिकेत आज शनिवारी आढावा बैठक संपल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघात
''कुठल्याही भाषेला विरोध नाही, पण त्या भाषेच्या सक्तीला विरोध आहेच! त्याविरुद्ध आंदोलन सुरु असताना आणि मराठी माणूस पेटून उठलेला असताना, आपल्या लक्षात येतंय का की मागल्या दाराने मराठी द्वेषी भाजपाचं काय चाललंय? गिरगाव चौपाटी येथे उद्धवसाहेबांनी मुंबईत सुरु केलेलं 'मराठी रंगभूमी दालन' गुपचूप रद्द करायचं, तिसरीकडे मराठी भाषा भवनात इतर कार्यालयं घुसवून त्याचं महत्व कमी करायचं आणि त्यातूनही मराठी भाषा भवनाच्या कामाला मुद्दाम उशीर करुन घोंगडं भिजवत ठेवायचं! हे सगळं कश्यासाठी करतंय भाजपा? गिरगाव चौपाटी येथे मराठीला विरोध कोणाचा असेल? स्थानिकांचा तर नव्हता, मग स्थानिक भाजपा आमदाराने केला का? की कुठल्या बिल्डर मित्राला ती जागा देणार आहेत? ह्याचे उत्तर महाराष्ट्र द्वेष्टे भाजपा देणार का? आणि ह्यांचा हा खेळ आपण मुंबईकर वेळेत ओळखणार का?'' असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.