Chh. Samhiaji Nagar News : गारखेड्यातील भगतसिंगनगरात १५ तोळे सोने चोरीला
esakal June 22, 2025 05:45 PM

गारखेडा : घरी कुणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी फ्लॅटचा दरवाजा तोडून तब्बल १२ तोळे सोने लंपास केले. ही घटना २० जून रोजी भरदिवसा घडली. कुटुंबातील महिला सायंकाळी सहा वाजता घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी स्नेहल अमोल देवाळे (वय ३५, रा. फ्लॅट. नं. ४०२, साई सुमन अपार्टमेंट, भगतसिंगनगर, गारखेडा) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार स्नेहल या खासगी नोकरी करतात, तर त्यांचे पती हे पुण्यात नोकरीला आहेत. ते अधूनमधून शहरात येत-जात असतात.

फिर्यादी या नेहमीप्रमाणे २० जूनरोजी सकाळी १० वाजता नोकरीवर गेल्या तर त्यांचा मुलगा शाळेत गेला होता. त्यांचे पती अमोल पुण्यात होते. सायंकाळी सव्वासहाला फिर्यादी स्नेहल या मुलासह घरी परतल्या, तेव्हा त्यांच्या फ्लॅटला कुलूप दिसले नाही, केवळ कडी लावलेली होती.

फिर्यादीने घरात प्रवेश केला असता बेडरबमधील कपाटातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. त्यांनी कपाटाची पाहणी केली असता, तब्बल १५ तोळे सोने चोरी गेल्याचे लक्षात आले.

Nagpur News : किशोरवयीन मुलींमध्ये गंभीर पोषण तुटवडा; लठ्ठपणा आणि वाढ खुंटण्याचा धोका हा लांबविला ऐवज

कपाटातील दोन तोळ्यांचा सोन्याचा नेकलेस, अडीच तोळ्यांच्या बांगड्या, दीड तोळ्यांचे मिनी गंठण, एक तोळ्याची साखळी, एक तोळ्याचे दोन वेढे, एक तोळ्याचे सोन्याचे मणी, सव्वा तोळ्याचे कानातले, अडीच तोळ्यांचे सोन्याचे कानातले जोड, एक तोळ्याचे १० मणी, दीड तोळ्याच्या तीन सोन्याच्या अंगठ्या, सहा ग्रामच्या दोन अंगठ्या असे एकूण १५ तोळ्यांचे दागिने (सात लाख ५५ हजार) लंंपास झाल्याचे समोर आले. याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक अर्जुन राऊत करत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.