Chh. Samhiaji Nagar News : तडजोडीत ३८ प्रकरणे निकाली; महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण खंडपीठाची लोकअदालत
esakal June 22, 2025 06:45 PM

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट), खंडपीठ येथे शनिवारी (ता. २१) लोकअदालत पार पडली. यात दाखल एकूण १७५ प्रकरणांपैकी ३८ प्रकरणे तडजोड होऊन निकाली काढण्यात आली.

महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण खंडपीठ औरंगाबाद, महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व उच्च न्यायालय विधी सेवा उपसमिती छत्रपती संभाजीनगर यांच्यातर्फे प्रशासकीय न्यायाधिकरणात प्रलंबित असलेल्या सेवाविषयक प्रकरणांबाबत लोकअदालतीचे आयोजन केले होते.

महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाचे उपाध्यक्ष माजी न्यायमूर्ती वि.का. जाधव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रशासकीय सदस्य विनय कारगावकर, न्यायिक सदस्य ए.एन. करमरकर, वकील संघाचे अध्यक्ष ॲड. डी.टी. देवणे, ॲड. के.बी. जाधव, मुख्य सादरकर्ता अधिकारी महेश भारस्वाडकर, प्रभारी प्रबंधक संदीप मुंडे

Chh. Samhiaji Nagar News : पॅट-वन चाचणीची घाई; शाळांत अजून प्रवेश प्रक्रिया सुरू

यांच्यासह पॅनल सदस्य, शासकीय अधिकारी व पक्षकार उपस्थित होते. या लोकअदालतीमध्ये एकूण १७५ प्रकरणांपैकी ३८ प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली. पॅनलप्रमुख म्हणून विनय कारगावकर, ए.एन. करमरकर, एस.जी. शेटे, एस.के. कुलकर्णी, ॲड एस.के. कदम, ॲड. पी.व्ही. बरडे यांनी काम पाहिले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.