Latest Marathi News Live Updates : लष्करप्रमुखांचा काश्मीर दौरा, अमरनाथ यात्रेपूर्वी सुरक्षा तयारीचा आढावा
esakal June 22, 2025 08:45 PM
Amarnathyatra Live Update: लष्करप्रमुखांचा काश्मीर दौरा, अमरनाथ यात्रेपूर्वी सुरक्षा तयारीचा आढावा

जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी काश्मीरमधील सुरक्षा ग्रिडचा आढावा घेतला आणि अमरनाथ यात्रा २०२५ संदर्भातील ऑपरेशनल तयारीचे मूल्यांकन केले.

Baramati : माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी आज मतदान

बारामती - माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होत असून आज मतदान सुरू आहे. सहकार बचाव शेतकरी पॅनलचे प्रमुख चंद्रराव तावरे मतदानासाठी मतदान केंद्रावर दाखल झाले आहेत. ८५ वर्षीय चंद्रराव तावरे हे चेअरमन पदाचे दावेदार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विरोधात तावरेंचा पॅनल आहे.

Pune : पुण्यात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे यशस्विनी सन्मान सोहळा

पुण्यात यशंवतराव चव्हाण प्रतिष्ठान आयोजित यशस्विनी सन्मान सोहळ्यात शरद पवार उपस्थित राहिले आहेत. राज्यभरात विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान होणार आहे. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे.

Ashadhi Wari : संत तुकाराम महाराजांची पालखी हडपसरमध्ये पोहोचली

आषाढी वारी सुरू असून संत तुकाराम महाराजांची पालखी हडपसरमध्ये पोहचली आहे. पुणे शहरातून मार्गस्थ झाल्यानंतर तुकोबांची पालखी हडपसर मध्ये दाखल होताच नागरिकांनी पालखीचं स्वागत केलं. पालखीचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी उसळली आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा आज मुक्काम लोणी काळभोरमध्ये असणार आहे.

Sanjay Raut Live : उद्वव आणि राज ठाकरे हे दोन्ही भाऊ निर्णय घेतील- संजय राऊत

युतीबाबत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे गोधे भाऊ निर्णय घेतील, त्यामुळे कुणाच्या म्हणण्याला काही अर्थ नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Pune Live : पुण्यातील सिंहगड उड्डाणपुलाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम रखडले,अजून एक महिना लागणार

सिंहगड रस्त्यावरील तिसऱ्या टप्प्यातील उड्डाणपूल १५ जून रोजी वाहतुकीसाठी खुला होणार असल्याचे महापालिका प्रशासनाने जाहीर केले होते. पण मे व जून महिन्यात झालेल्या जोरदार पावसानंतर या कामाचे नियोजन बिघडले आहे.

Sandip Deshpande Live : बॅनरबाजी केल्यामुळे युती होऊ शकत नाही : संदीप देशपांडे

मनसे आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या युतीच्या चर्चा सुरु असतानाच मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दोन्ही मोठे निर्णय घेतील, बॅनरबाजी केल्याने युती होऊ शकत नाही, असे म्हटले आहे.

Pune Live : संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दिवेघाटाकडे प्रस्थान

संत ज्ञानेश्वर महाराजांचा पुण्यात मुक्कामानंतर आज सकाळी दिवेघाटाचा दिशेन प्रस्थान झाले.

Pune Live : माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीसाठी अजित पवार, सुप्रिया सुळे यांनी केले मतदान

माळेगाव सहकारी कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठीआज मतदान होत असून अध्यपदासाठी उमेदवार असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी मतदान केले. खासदार सुप्रिया सुळे यांनीही मतदान केले. अजित पवार यांच्यासमोर शरद पवार गट आणि चंद्रराव तावरे गटाचे आव्हान आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.