लीड्समधील हेडिंग्ले येथे होत असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंड क्रिकेट संघाने पहिल्या डावात भारतीय संघाला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. ऑली पोप आणि हॅरी ब्रुकच्या शानदार खेळानंतर इंग्लंडच्या तळातल्या फलंदाजांनीही भारतीय गोलंदाजांना सतावलं होतं. पण तरी जसप्रीत बुमराहने घेतलेल्या ५ विकेट्सच्या जोरानर भारताने पहिल्या डावात ६ धावांची आघाडी घेतली.
या सामन्यात भारताचा पहिला डाव दुसऱ्या दिवशी ४७१ धावांवर संपुष्टात आला होता. त्यानंतर इंग्लंडचा संघ पहिल्या डावातील फलंदाजीसाठी उतरला. इंग्लंडकडून झॅक क्रावली आणि बेन डकेट यांनी डावाची सुरुवात केली. पण जसप्रीत बुमराहने पहिल्याच षटकात क्रावलीला ४ धावांवर करूण नायरच्या हातून झेलबाद केले.
ENG vs IND, 1st Test: 'मारून मारून सुजवलंय यार...', रिषभ पंतचा जडेजासोबत मजेशीर संवाद; Video तुफान व्हायरलपण त्यानंतर बेन डकेटला ऑली पोपची भक्कम साथ मिळली. डकेटचा १५ धावांवर झेलही सुटला होता, ज्याचा त्याने फायदा घेत अर्धशतकी खेळी साकारली. डकेट आणि पोप यांच्यात दुसर्या विकेटसाठी १२२ धावांची भागीदारी झाली, ज्यामुळे इंग्लंडच्या डावाचा पाया रचला गेला. अखेर ६२ धावांवर बुमराहने डकेटला अप्रतिम चेंडू टाकत त्रिफळाचीत केले.
पण जो रुटने पोपला साथ दिली. त्यांच्यातही ८० धावांची भागीदारी झाली. ज्यामुळे इंग्लंडने ४७ षटकांच्या आतच २०० धावा पार केल्या होत्या. पण अखेर ४७ व्या षटकात बुमराहनेच जो रुटला २८ धावांर करूण नायरच्याच हातून झेलबाद केले. पण तोपर्यंत पोपने शतक केले होते. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा इंग्लंडने ३ बाद २०९ धावा केल्या होत्या. पोप १०० धावांवर नाबाद होता, तर हॅरी ब्रुक शून्यावर नाबाद होता.
तिसऱ्या दिवशीही पोप आणि ब्रुकने आक्रमक सुरुवात केली होती. पण पोपला प्रसिद्ध कृष्णाने चकवले आणि त्याचा झेल रिषभ पंतने घेतला. पोपने १३७ चेंडूत १४ चौकारांसह १०६ धावांची खेळी केली. पोप बाद झाल्यानंतरही इंग्लंडचे फलंदाज महत्त्वाच्या भागीदाऱ्या करत गेले. त्यातच भारतीय क्षेत्ररक्षकांकडून काही झेलही सुटले. जैस्वालने बुमराहच्या गोलंदाजीवर ३ झेल सोडले.
ब्रुक आणि स्टोक्स यांच्यातही पाचव्या विकेटसाठी ५१ धावांची भागीदारी झाली. पण स्टोक्सला २० धावावंर मोहम्मद सिराजने बाद केले. त्यानंतर जॅमी स्मिथ आणि ब्रुक यांचीही जोडी जमली. त्यांच्यातही ७३ धावांची भागादीरी झाली. ज्यामुळे इंग्लंडने सहज ३५० धावांचा टप्पा पार केला.
ENG vs IND, 1st Test: अंपायर ऐकतच नाही! गिल-बुमराहने प्रयत्न केले, रिषभ पंतने तर रागात बॉलच फेकला; जाणून घ्या नेमकं काय झालंस्मिथला ४० धावांवर प्रसिद्ध कृष्णाने बाद केले. त्याचा झेल बाऊंड्री लाईनवर रवींद्र जडेजा आणि साई सुदर्शन यांनी मिळून घेतला. त्यानंतरही ब्रुकला ख्रिस वोक्स साथ देत होता. ब्रुकने आक्रमक पवित्रा घेतला होता.
ब्रुकचा झेलही तो ८२ धावांवर असताना यशस्वी जैस्वालकडून सुटला. पण हे जीवदान फार महागात पडलं नाही, कारण त्याला प्रसिद्ध कृष्णाने ८८ व्या षटकात शार्दुल ठाकूरच्या हातून ९९ धावांवर झेलबाद केले. केवळ १ धावेने शतक हुकल्याने ब्रुक अत्यंत निराश झाला होता.
पण तो बाद झाल्यानंतरही ब्रायडन कार्स आणि ख्रिस वोक्स यांच्यात ८ व्या विकेटसाठी ५५ धावांची भागीदारी झाली. त्यामुळे इंग्लंडने ४५० धावा पार केल्या. कार्सला मोहम्मद सिराजने २२ धावांवर त्रिफळाचीत केले.
तर ९९ व्या षटकात वोक्सला जसप्रीत बुमराहने ३८ धावांवर त्रिफळाचीत केले. बुमराहनेच १०१ व्या षटकात जोश टंगला ११ धावांवर बाद करत इंग्लंडचा डाव अखेर १००.४ षटकात ४६५ धावांवर संपवला.
भारताकडून जसप्रीत बुमराहने शानदार गोलंदाजी करताना ५ विकेट्स घेतल्या. प्रसिद्ध कृष्णाने ३ विकेट्स घेतल्या, तर मोहम्मद सिराजने २ विकेट्स घेतल्या.