IND vs ENG: जयस्वाल नाही, ‘हा' खेळाडू इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत 700 धावा करेल, सुनील गावस्करांची भविष्यवाणी!
Marathi June 23, 2025 06:25 PM

भारतीय संघाचे माजी दिग्गज खेळाडू सुनील गावस्कर यांनी त्या खेळाडू बद्दल भविष्यवाणी केली आहे (Indian Former cricketer Sunil Gavaskar prediction on KL Rahul) . जो खेळाडू इंग्लंड विरुद्ध मालिकेत 700 पेक्षा जास्त धावा करेल. गावस्कर यांनी यशस्वी जयस्वालचे (Yashsvi jaiswal) नाव घेतलं नाही. त्यांनी के एल राहुलच नाव घेतलं आहे. सुनील गावस्कर यांनी केएल राहुलचे कौतुक केले आहे. जो लीड्समध्ये इंग्लंड विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवशी भारतासाठी दुसऱ्या डावात 47 धावा करून नाबाद खेळत आहे. 33 वर्षांचा राहुल आत्तापर्यंत आत्मविश्वासाने खेळताना दिसलेला आहे आणि त्याची खेळी टीम इंडियासाठी नक्कीच महत्वाची ठरणार आहे.

गावस्कर यांनी राहुल विषयी म्हटले, केएल राहुलला खेळताना बघणे खूप छान वाटते. तो बॅकफुट आणि फ्रंटफूट पासून शॉट खेळतो. त्याचं कव्हर ड्राईव्ह देखील परफेक्ट आहे, तो एक शानदार फलंदाज आहे आणि मला आशा आहे की तो या मालिकेत 700 धावा करेल.

ते पुढे म्हणाले, राहुल पूर्णरित्या एक संघ आहे. जेव्हा तो एखाद्या परिस्थितीवर पोहोचतो, तेव्हा तुम्ही आक्रमकता बघत नाही, कारण त्याला दिखावा करणे आवडत नाही. त्याची एकच चिंता आहे की, तो स्वतःचे कौशल्य नीट ओळखू शकला नाही.

भारताच्या दुसऱ्या डावात यशस्वी जयस्वाल (4) आणि साई सुदर्शन (30) धावांवर बाद झाले आहेत. सध्या राहुल आणि कर्णधार गिल खेळपट्टीवर टिकून आहेत. राहुलने पहिल्या डावामध्ये 42 धावा केल्या होत्या. ज्यामध्ये भारताने 471 धावा केल्या होत्या. त्यानंतर इंग्लंड संघाने 465 धावा करून संघ ऑल आऊट झाला. भारतीय संघाने 6 धावांनी आघाडी घेतली होती. भारताच्या जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) इंग्लंडच्या पहिल्या डावात शानदार गोलंदाजी करत 5 विकेट्स घेतल्या होत्या.

तसेच दुसरीकडे चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) देखील राहुलच्या फलंदाजी बद्दल त्याची प्रतिक्रिया देत म्हटले, तो पूर्ण रित्या एक कसोटी खेळाडू आहे आणि मोठ्या धावा करू शकतो. राहुल जेव्हा खेळपट्टीवर स्थिर झालेला असतो,तेव्हा तो बाद होतो. त्याने या स्थितीमध्ये सुधार करण्याची गरज आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.