आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आहाराकडे अनेकदा दुर्लक्ष होते. यामुळे आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. तसेच शरीराला आवश्यक पोषणही मिळत नाही. फास्ट फूडमुळे अधिकच्या कॅलरीजचे सेवन केले जाते. यामुळे चरबी वाढते आणि वजनही झपाट्याने वाढते. अशातच तुळस ही तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. तुळशी केवळ आयुर्वेदातच नाही तर मॉडर्न सायन्स मध्ये सुधा औषधी गुणधर्मांसाठी ओळखली जाते. यामुळे वजन कमी करण्यासाठी तुम्ही तुळशीच्या पानांचा अनेक प्रकारे वापर करू शकता.
तुळशीमध्ये अँटी-ऑक्सिडेंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि मेटाबॉलिज्म वाढवणारे गुणधर्म असतात. यामुळे पदार्थ काढून टाकण्यास तसेच वजन कमी करण्यास मदत होते. तुळशीच्या पानांमधील पोषक तत्त्वांमुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. तुळशीमध्ये सोडियम, पोटॅशियम, लोह, प्रथिने, फायबर आणि व्हिटॅमिन सी फार मोठ्या प्रमाणात असते.
तुळशीचा चहा:
तुळशीचा चहा प्याल्याने मेटॅबोलिसम वाढते आणि चरबी कमी होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होते. यासाठी फक्त ८- १० तुळशीची पाने पाण्यात उकळा. त्यात थोडे मध व थोडा लिंबाचा रस मिसळून प्या.
तुळस आणि मध:
तुळशीच्या पानांचा रस काढून त्यात मध टाकून सकाळी उपाशी पोटी प्या. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.
तुळस आणि आल्याचा काढा:
तुळशीची पानं आणि आलं पाण्यात उकळून त्याचा कडा बनवा. त्यात थोडे मध मिसळून प्या. ही पद्धत पोटाची चरबी कमी करण्यास उपयुक्त ठरते. तसेच खोकला असल्यास हा काढा पिल्याने आराम मिळू शकतो.
तुळशीचे पाने:
हा सर्वात सोपा उपाय आहे. रोज सकाळी चार ते पाच तुळशीची पाने खाल्ल्याने पचन क्रिया सुधारते व शरीरात जमा होणारी अतिरिक्त चरबी कमी होऊ लागते.
तुळस आणि दालचिनीचे पाणी:
तुळशीची पाने आणि दालचिनी पाण्यात उकळून प्यावे. हे पाणी शरीरातील मेटॅबोलिसम समतोल करते व पोटाची चरबी कमी करण्यात प्रभावी ठरते.