Latest Marathi News Updates : मुंबई अहमदाबाद महामार्गावर जुन्या वर्सोवा ब्रिजवरून टँकर खाली कोसळला, एकाचा मृत्यू
esakal June 23, 2025 08:45 PM
Solapur Live : अबू आझमी यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात सोलापुरातील वारकरी रस्त्यावर उतरत झाले आक्रमक

- अबू आझमी यांच्या 'वारीमुळे रस्ता जाम होतो' या वक्तव्याच्या विरोधात वारकऱ्यांचे टाळ वाजवत निषेध आंदोलन

- सोलापुरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात करण्यात येत आहे आंदोलन

- अखिल भाविक वारकरी मंडळाकडून करण्यात येत आहे आंदोलन

- अबू आझामी यांनी विधान मागे नाही घेतलं, तर राज्यभरातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Nashik Live : पळसेतील ब्रिटिशकालीन पूल कोसळण्याच्या उंबरठ्यावर! प्रशासनाचे दुर्लक्ष कायम

नाशिक-पुणे महामार्गावरील पळसे गावाकडे जाणारा मुख्य रस्ता अनेक वर्षांपासून शिवनाल्यावरून जात असून, या मार्गावर ब्रिटिश कालखंडातील सुमारे शंभर वर्षांपूर्वी बांधलेला दगडी पूल अद्याप वापरात आहे. मात्र, पुल जुना झाल्याने व दीर्घकाळापासून दुरुस्ती न झाल्यामुळे तो सध्या पूर्णपणे जीर्णावस्थेत असून, वाहतुकीस अत्यंत धोकादायक ठरतो आहे. पावसाळ्यात कोणत्याही क्षणी पूल कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Mumbai Live : मुंबई अहमदाबाद महामार्गावर जुन्या वर्सोवा ब्रिजवरून टँकर खाली कोसळला, एकाचा मृत्यू

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील घोडबंदर येथील जुन्या वर्सोवा ब्रीजवरून एक टँकर लोखंडी ग्रीलचा कठडा तोडून खाली पडला. टँकर बुडाला असून ड्रायव्हरचा मृत्यू झाला.

हा टँकर वसईवरून ठाण्याकडे जात होता. गुजरातवरून मुंबईकडे येणाऱ्या लेनवर ही घटना घडली. या टँकरने आधी लाकडाने भरलेल्या टेलरला मागून धडक दिली होती. त्यानंतर तो खाली खाडीत कोसळला.

Pune Live : पुणे-अहिल्यानगर महामार्गावर मद्यधुंद तरुणाचा भर रस्त्यात धिंगाणा

पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर मध्ये पुणे अहिल्यानगर महामार्गावर भर रस्त्यात एका तरुणाने दारूच्या नशेत धिंगाणा घातला. या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांना अडवून त्यांना शिवीगाळ त्याने केली. या तरुणाला नागरिकांनी नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ऋषिकेश सुकाळकर असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून तो नेवासा चा रहिवासी आहे. रविवारी दुपारच्या सुमारास तो शिक्रापूर येथे वाहने अडवून वाहतुकीस अडथळा निर्माण करत होता. त्याचबरोबर सार्वजनिक बसचा दरवाजा जबरदस्तीने उघडून प्रवाशांना त्रास देत होता. सदर प्रकार लक्षात येताच काही नागरिकांनी धाडस करून त्याला पकडले व शिक्रापूर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन सुकाळकर याला ताब्यात घेतले.

Devendra Fadnavis LIVE Updates: अंदाज समित्या केवळ अर्थसंकल्पावर लक्ष ठेवत नाहीत,तर विभागांना जबाबदार धरतात - मुख्यमंत्री

अंदाज समित्यांमुळे लोकशाही अधिक जबाबदार आणि पारदर्शक लोकशाहीत सरकारवर नियंत्रण ठेवण्याचं कार्य संसद करतं, आणि समित्यांमुळे ते अधिक प्रभावी होतं.

अंदाज समित्या केवळ अर्थसंकल्पावर लक्ष ठेवत नाहीत,तर विभागांना जबाबदार धरतात आणि सत्य माहिती समोर आणतात.- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Israel-Iran War LIVE Updates: इराणवरील हल्ल्याचा उत्तर कोरियाकडून निषेध

इराणवरील हल्ल्याचा उत्तर कोरियाकडून निषेध

उत्तर कोरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेच्या कारवाईवर तीव्र टीका करत म्हटलं: इराणवरील हल्ला हा सार्वभौम अधिकारांचे गंभीर उल्लंघन मध्यपूर्वेतील तणावाला अमेरिका आणि इस्रायल जबाबदार

Live Update: संसदेच्या अंदाज समिती स्थापनेच्या ७५ वर्षपूर्ती कार्यक्रमाला सुरुवात

उद्घाटन समारंभास लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती.

PM modi Live Update: शहीद दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांना श्रद्धांजली वाहिली

शहीद दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांना श्रद्धांजली वाहिली

Mumbai Live Update: मुंबईतील नीलकंठ आगीला लाग

मुंबईतील नीलकंठ आगीला लाग लागल्याची घटना समोर आली आहे.

Uttar Pradesh Live Update: बुदौन येथील राम लीला मैदानातील प्रदर्शनात भीषण आग लागली, अग्निशमन दलाचे काम सुरू

बुदौन येथील राम लीला मैदानातील प्रदर्शनात भीषण आग लागली. अग्निशमन दलाचे काम सुरू आहे. अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.

Pune : माळीणजवळ दरड कोसळली, पसारवाडी गावचा संपर्क तुटला

माळीणमध्ये दरड कोसळून घडलेल्या दुर्घटनेच्या आठवण आज पुन्हा ताज्या झाल्यात. माळीणजवळच असलेल्या पसारवाडी इथं डोंगरकड्यावर दरड कोसळलीय. सुदैवानं या घटनेत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. मात्र पसारवाडी गावचा संपर्क तुटल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar : जलील यांच्याविरोधात जनआक्रोश मोर्चा, आंबेडकरी समाजाकडून अटकेची मागणी

छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या अटकेची मागणी करत आंबेडकरी समाजाचा जनआक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे. सकाळी ११ वाजता क्रांती चौकातून हा मोर्चा निघणार आहे. इम्तियाज जलील यांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर आरोप करताना पत्रकार परिषदेत आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला होता. या प्रकरणी जलील यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nashik : नाशिक-दिल्ली विमानसेवा आठवड्यातून तीनच दिवस

दिल्ली विमानतळावर धावपट्टीचं काम सुरू असल्यानं नाशिक दिल्ली विमानसेवेला फटका बसला आहे. आठवड्यातून तीनच दिवस नाशिक दिल्ली विमानसेवा सुरू राहणार आहे. 15 सप्टेंबरपर्यंत हे काम सुरू राहणार असल्यानं तोपर्यंत नाशिक-दिल्ली विमानाच्या फेऱ्या कमी राहतील.

Sanajay Raut Live : हिंदी सक्ती गुजरातमध्ये का नाही ? संजय राऊत यांचा सवाल

संजय राऊत यांनी गुजरात मध्ये हिंदी सक्ती का नाही असा सवाल करतानाच हिंदी सक्तीविरोधात भाष्य करणाऱ्या लेखक, विचारवंत अभिनेत्यांचे कौतूक केले आहे.

Mumbai Live : वारीसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी अबू आझमींना अल्पसंख्यांक आयोगाची नोटीस

अबू आझमी यांनी वारीसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले दरम्यान याच मुद्द्यावर बोट ठेवेत महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे प्यारे खान यांनी आझमी यांना नोटीस बजावली आहे.

Mumbai Live : ठाणे- मुंबई महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

मुंबईतील- ठाणे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. माजीवाडा, आनंननर जकातनाका परिसरात वाहतूक कोंडी झाली आहे.

Pandharpur Live : पंढरपूरमध्ये चंद्रभागा नदीत बुडणाऱ्या 6 भाविकांना वाचविले

आषाढी एकादशी जवळ आल्याने पंढरपूरमध्ये भाविकांची गर्दी होऊ लागली आहे तसेच उजनी धरणात पाणी सोडल्याने चंद्रभागा तुडूंब वाहत आहे. चंद्रभागेत स्नानासाठी उतरलेले 6 भाविक बुडू लागले. त्यांना प्रशासनाने नेमलेल्या कोळी बांधवांनी वाचविले आहे.

Mumbai Live : गोरेगाव फिल्मसिटीत आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक

गोरेगाव फिल्मसिटी मध्ये भीषण आग लागली असून या आगीत 'अनुपमा' या हिंदी मालिकेचा सेट जळून खाक झाला आहे. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

Air India Flights Cancelled : एअर इंडियाची आणखी २ उड्डाणे रद्द

अहमदाबाद अपघातानंतर एअर इंडियाची उड्डाणे सातत्याने रद्द केली जात आहेत. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौला जोडलेल्या एअर इंडियाच्या आणखी २ उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. आतापर्यंत लखनौला जोडलेल्या एअर इंडियाच्या १३ उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

Operation Sindhu : इराणमधून आणखी २८५ भारतीय सुखरूप परतले; एकूण १७०० हून अधिक नागरिक भारतात दाखल

नवी दिल्ली : इराणमध्ये सुरू असलेल्या संघर्षादरम्यान, भारत सरकारने 'ऑपरेशन सिंधू' अंतर्गत आपल्या नागरिकांना सुरक्षितपणे परत आणण्याचे काम वेगवान केले आहे. रविवारी रात्री आणखी एका विशेष विमानाने २८५ भारतीय नागरिकांना भारतात आणले, ज्यामुळे आतापर्यंत सुरक्षितपणे बाहेर काढलेल्या भारतीयांची एकूण संख्या १,७१३ झाली आहे.

Prakash Abitkar : कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीची पालकमंत्री आबिटकरांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक

कोल्हापूर : जिल्हा नियोजन समितीची बैठक सोमवारी (ता. २३) सकाळी ११.३० वाजता महाराणी छत्रपती ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी सहपालकमंत्री माधुरी मिसाळ उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत दोन फेब्रुवारी रोजी आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या इतिवृत्तास व इतिवृत्तावरील कार्यपूर्ती अहवालास मान्यता देणे, जिल्हा वार्षिक योजना सन २०२४-२५ अंतर्गत मार्च २०२५ अखेरच्या खर्चास मान्यता देणे, जिल्हा वार्षिक योजना सन २०२५-२६ मधील मंजूर नियतव्यय व आयत्या वेळचे विषय होणार आहेत.

Karnataka Rain : कर्नाटकातील १७ जिल्ह्यांत अजूनही पावसाची प्रतीक्षा

बंगळूर : गेल्या दोन आठवड्यांपासून किनारी आणि डोंगराळ जिल्ह्यांमध्ये जोरदार बरसणारा नैऋत्य मॉन्सून दक्षिणेकडील अंतर्गत भागात कमकुवत झाला आहे. ज्यामुळे राज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये दमदार पावसाची अजूनही प्रतीक्षा आहे.

10th Student : दहावीच्या विद्यार्थिनीने हेरवाडमध्ये संपवले जीवन

कुरुंदवाड : हेरवाड (ता. शिरोळ) येथील काळमवाडी वसाहतीत शाळकरी मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. इंद्रायणी राजेंद्र मोहिते (वय १६) असे तिचे नाव आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. इंद्रायणी दहावीत शिकत होती. खेळाडू म्हणूनही तिने ओळख मिळविली होती.

Kolhapur Rain : पंचगंगेच्या पाणीपातळीत दीड फूट घट; कोल्हापूर शहरासह धरणक्षेत्रात उसंत, वीस बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाची रविवारी उघडझाप राहिली. अधूनमधून कोसळणाऱ्या हलक्या व जोरदार सरी वगळता शहरासह धरणक्षेत्रातही पावसाची उसंत पाहायला मिळाली. यामुळे पंचगंगेची पाणीपातळीत दिवसभरात जवळपास दीड फुटाने कमी झाली. जिल्ह्यातील २० बंधारे अद्याप पाण्याखाली आहेत. हवामान खात्याने जिल्ह्यात ऑरेंज अलर्टचा इशारा दिला होता.

Ashadhi Wari : हरिनामाच्या गोडव्याने दिवेघाटाची वाट सुखद

पुणे / सासवड : टाळ मृदंगाचा गजर आणि हरिनामाचे गोडवे गात चाललेल्या वारकऱ्यांच्या लक्ष लक्ष पावलांनी माउलीनामात दंग होत ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने रविवारी पुणेकरांचा भक्तिमय वातावरणात निरोप घेतला.

Iran-Israel Conflict : इराणच्या तीन अणुकेंद्रांवर अमेरिकेकडून 'बंकर बस्टर'चा मारा

Latest Marathi Live Updates 23 June 2025 : इराण-इस्राईल संघर्षात अमेरिकेने उडी घेत काल पहाटे इराणमधील तीन अणुकेंद्रांवर बाँब टाकले. या हल्ल्यात या तिन्ही अणुकेंद्रांचे मोठे नुकसान झाल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला. यावर, इराणनेही प्रत्युत्तर देताना, ‘आता चर्चा करण्याची वेळ संपली असून आमचे संरक्षण करण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे,’ असा इशारा दिला. तसेच हवामान खात्याने आज कोल्हापूर जिल्ह्यात ऑरेंज अलर्टचा इशारा दिला होता. शाहूवाडी तालुक्यातील बर्की धबधबा पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. बेळगावसह महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात कन्नडची सक्ती करून मराठीची गळचेपी करणाऱ्या कर्नाटक सरकारने मंगळूर (दक्षिण कन्नड) जिल्ह्यात कन्नडची सक्ती करणारे परिपत्रक जारी केले आहे. त्यामुळे तुळू भाषिक दुखावले असून, दक्षिण कन्नड आणि उडुपी भागात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून किनारी आणि डोंगराळ जिल्ह्यांमध्ये जोरदार बरसणारा नैऋत्य मॉन्सून दक्षिणेकडील अंतर्गत भागात कमकुवत झाला आहे. ज्यामुळे राज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये दमदार पावसाची अजूनही प्रतीक्षा आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.