Pune Railway Station: पुणे रेल्वे स्टेशनच्या नामांतराची आता चर्चा सुरु झाली आहे. त्यातच स्टेशनला कोणाचं नाव द्यायचं? त्यावरुन आता वाद निर्माण झाला आहे. यासाठी चार विविध नावं यासाठी पुढे आली असून विविध राजकीय गटांकडून ही नावं पुढं आणण्यात आली आहेत. यामध्ये पुण्यातील राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी यासाठी श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव सुचवलं आहे. तर स्टेशनला महात्मा ज्योतिबा फुले यांचं नाव देण्याची मागणी संभाजी ब्रिगेडनं केली आहे.
Nitin Gadkari : आता टोलनाके राहणार नाहीत, १५ दिवसात नवी पॉलीसी, तुमची तक्रार राहणार नाही; गडकरींची मोठी घोषणामेधा कुलकर्णी यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना म्हटलं की, "पुणे स्टेशनला श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव देण्यात यावं, अशा प्रकारची मागणी पुण्यातल्या अनेक संघटनांनी वेळोवेळी केलेली आहे. मी सुद्धा याचा पुनरुच्चार आजच्या मिटिंगमध्ये केला. पुण्यातील सांस्कृतीक इतिहासाच्या ज्या काही पाऊलखुणा आहेत, त्या पुणे रेल्वे स्टेशनवर दिसल्या पाहिजेत. अशी मागणी मी केलेली आहे. पुणे स्टेशनचं नुतनीकरण होणार आहे, त्या पार्श्वभूमीवर मी ही मागणी केलेली आहे.
Hasan Mushrif : हसन मुश्रीफ अबू आझमींना समजावून सांगणार वारीचा विषय! पुन्हा वादग्रस्त विधानामुळं झाले टीकेचे धनीतर संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष संतोष शिंदे यांनी म्हटलं की, "आज शिक्षणाची ओळख म्हणून तसंच विद्येचं माहेरघर म्हणून पुण्याची ओळख केवळ महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर आणि जगभर आहे. ही ओळख केवळ महात्मा फुलेंच्या शैक्षणिक चळवळीमुळं झाली. आम्हाला परत आधुनिक पेशवाई नको आहे, त्यामुळं पुणे स्टेशनला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांचंच नाव दिलं गेलं पाहिजे. यासंदर्भात आम्ही लवकरच बैठक घेऊन आणि पुन्हा एकदा हा लढा लढण्याचं काम करु. पण पुणे रेल्वे स्टेशनला महात्मा फुलेंचंच नाव दिलं गेलं पाहिजे"
Chh. Sambhaji Nagar News : संभाजीनगरात संतप्त नागरिकांकडून राज्यपालांचा ताफा अडवला; पोलिसांची एकच धावपळ!त्याचबरोबर रिपब्लिकन पक्षाचे नेते सचिन खरात यांनी देखील या वादात उडी घेतली आहे. त्यांनी म्हटलं की, "मेधा कुलकर्णी यांनी पुणे रेल्वे स्टेशनला थोरले बाजीराव पेशव्यांचं नाव देण्याची मागणी केल्याचं समजत आहे. पेशव्यांच्या काळात पेशव्यांनी हीच 'राज्यभिषेक शक' बंद करुन 'फसली शक' निर्माण केली. आमची स्पष्ट मागणी आहे की पुण्याच्या रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशव्यांचं नाव देऊ नये. पुण्याच्या रेल्वे स्थानकाला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचंच नाव देण्यात यावं"
Mumbai Water Supply: नवी मुंबईत दूषित पाण्याचा पुरवठा, नागरिकांचे आरोग्य धोक्यात; पालिकेविरोधात मनसे आक्रमकतर आणखी चौथं नावही पुणे स्टेशनला देण्याची मागणी करण्यात आली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी पुणे रेल्वे स्टेशनला गोपाळ कृष्ण गोखले किंवा महात्मा फुले यांचं नाव देण्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हटलं की, "पुणे स्टेशनचं नाव बदलू नये अशी आमची भूमिका आहे. पण द्यायचंच असेल नवा तर महात्मा ज्योतिबा फुले रेल्वे स्टेशन किंवा नामदार गोपाळकृष्ण गोखले रेल्वे स्टेशन असं नाव देण्यात यावं. यांनी देखील या शहरासाठी आणि त्यांच्या क्षेत्रात केलेलं काम हे निश्चितच दखल घेण्यासारखं आहे.