बजाजनगर : शहरात अवैध धंदे वाढले आहेत. पण, पोलिस ठोस कारवाई करीत नाहीत. ही बाब ‘सकाळ’ने ‘कुठेय पोलिस?’ या वृत्तमालिकेतून अधोरेखित केली. त्यामुळे पोलिस खडबडून जागे झाले असून, वाळूज औद्योगिक परिसरात दुसऱ्या रविवारी (ता. २२) शहर गुन्हे शाखेच्या पथकाने एका स्क्रॅपच्या (भंगाराच्या) गोदामावर छापा टाकला. साजापूर येथे केलेल्या या कारवाईत नशेच्या गोळ्या असल्याच्या संशयावरून टॅब्लेटची रिकामी पाकिटे आणि स्ट्रिप्स ताब्यात घेतल्या. प्रयोगशाळेत त्यांच्या तपासणीनंतर पुढील कारवाई होणार आहे.
अमली पदार्थ प्रतिबंधक पथक (एनडीपीएस) पथकाने साजापूर परिसरात शुक्रवारी (ता. २०) छापा टाकला होता. यात दोन भंगाराचे साहित्य असलेल्या दोन गोदामांतून एका मोठ्या कंपनीतील रसायनयुक्त पावडरचा साठा जप्त केला.
ही पावडर औषधनिर्मितीसाठी वापरली जात होती. कंपनीतील भंगार म्हणून विक्री करण्यात येत असलेल्या बंद ड्रममध्ये ती होती, अशी प्राथमिक माहिती पोलिस तपासात समोर आली. पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांच्या नेतृत्वाखाली दोन वाहने आणि दोन गोदाम सील करण्यात आले. त्याच्या अवघ्या दोन दिवसांत ही दुसरी मोठी कारवाई करण्यात आली.
Chh. Sambhaji Nagar news : ऑपरेशन प्रहारची जोरदार धडक! अवघ्या २ दिवसांत १२० अटक, लाखोंचा दारू साठा जप्तदरम्यान, त्यावेळी अन्य एका गोदामाकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. ही कंपनी असलेल्या गल्लीमध्येच हे गोदाम आहे. आता रविवारी या गोदामावर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला.
फॉरेन्सिकच्या अहवालानंतर कारवाईभंगाराच्या या गोदामांमध्ये पावडर, गोळ्यांची रिकामी पाकिटे आणि स्ट्रिप कशासाठी आणल्या होत्या. त्यांचा नशेच्या गोळ्यांसाठी वापर केला जात असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याच संशयातून पोलिसांनी ही कारवाई केली. हे पावडर आणि गोळ्यांचे नमुने फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. प्रयोगशाळेच्या अहवालानंतर पुढील कारवाई होणार आहे.