- डॉ. मृदुल देशपांडे, MBBS, फंक्शनल मेडिसिन नूट्रिशनिस्ट
आजकाल अनेक जण विविध शारीरिक तक्रारी घेऊन डॉक्टरकडे जातात. थकवा, पचनाच्या तक्रारी, केस गळणे, त्वचेचा उजाळा कमी होणे, वजन वाढणे किंवा झोप न लागणे. अनेक वेळा साधारण चाचण्या (जसं की सीबीसी, लिपिड प्रोफाइल, थायरॉईड) या नॉर्मल येतात; पण रुग्ण अजूनही त्रस्तच असतो. इथेच फंक्शनल मेडिसीनचा मूलमंत्र ‘Test, Don’t Guess’ महत्त्वाचा ठरतो.
लक्षणांपलीकडे पाहणं आवश्यक आहे
परंपरागत वैद्यकशास्त्रात, जर चाचणीत काही ‘असामान्य’ नोंद झाल्यावरच निदान केलं जातं; पण फंक्शनल मेडिसिनमध्ये, केवळ ‘नॉर्मल’ की ‘अॅब्नॉर्मल’ यावर न थांबता, तर शरीरात होणाऱ्या बारीकसारीक बिघाडांवर लक्ष केंद्रित करणं गरजेचं असतं. कारण प्रत्येक माणूस वेगळा असतो. त्याची जीवनशैली, आहार, तणाव, झोप, आनुवंशिकता सगळं अनोखं असतं.
फंक्शनल चाचण्या म्हणजे काय?
फंक्शनल चाचण्या या डायनॅमिक बायोमार्कर्स तपासतात. म्हणजे शरीरातल्या प्रक्रियांमधील कार्यक्षमता. या चाचण्या कोणत्या बिघाडाची सुरुवात कुठून झाली आहे हे दाखवतात. अगदी त्रास निर्माण होण्याच्या आधीपासून.
काही महत्त्वाच्या फंक्शनल चाचण्या
Comprehensive Stool Analysis : पचनसंस्था, सूज, बॅक्टेरियाची स्थिती (Dysbiosis), Candida, इ.
Diabetic and Metabolic Profile : यामध्ये Fasting Insulin, HOMA-IR, Microalbumin Creatinine ratio या चाचण्या असतात. डायबेटिज हा फक्त Fasting Sugar and PP इतकाच मर्यादित नाही.
DUTCH Hormone Test : महिला-पुरुषांचे संपूर्ण हार्मोन प्रोफाइल, Cortisol Rhythm, DHEA.
Food Sensitivity Test (IgG based) : अन्नामुळे होणारी विलंबित सूज किंवा पचनतंत्रावर होणारा परिणाम.
Micronutrient Testing : शरीरात कुठल्या व्हिटॅमिन्स, मिनरल्स, अमिनो अॅसिड्स, अँटीऑक्सिडंट्स कमी आहेत व असेच अजून बरेच.
अंदाजावर अवलंबून राहणं धोकादायक का?
केवळ लक्षणं पाहून सप्लिमेंट सुरू करणं किंवा कोणता पदार्थ बंद करणं हा अंदाजपद्धतीवर आधारित मार्ग असतो. यात अनेकदा चुकीची दिशा घेतली जाते. उदाहरणार्थ, मधुमेहाचं निदान झालंय, म्हणून अँटी-डायबेटिक ड्रग्ज दिले जातात.
त्याचा अक्षरशः मारा होतो; पण मूळ कारण असतं, अतिरिक्त रक्तात असलेलं इन्सुलिन (Hyperinsulinemia). त्यामुळे, पहिले इन्सुलिनला ट्रिट करणं महत्वाचं ठरतं. त्यासाठी Fasting Insulin व HOMA IR या चाचण्या गरजेच्या असतात. याने आपण मुळाशी जाऊन तो रोग रिव्हर्सलला आणू शकतो.
Functional Testing म्हणजे गुंतवणूक
हो, ही चाचण्या सामान्य चाचण्यांपेक्षा महाग असतात; पण त्या केवळ निदानासाठी नसतात, तर त्या उपचाराचा आराखडा ठरवण्यासाठी ‘रोडमॅप’ देतात. त्या तुम्हाला तुमचं शरीर नीट समजून घेण्यास मदत करतात. जसजसं आपण शरीरातले ‘सिग्नल्स’ ओळखायला शिकतो, तसतसं आरोग्याचं नियंत्रण आपल्याच हातात येतं.
निष्कर्ष
आजच्या घाईच्या जगात आपण वेळ व पैसा ‘guesswork’ वर खर्च करत राहतो. Functional Medicine आपल्याला या चुकीच्या चक्रातून बाहेर काढते. म्हणूनच, Test, Don’t Guess. कारण अचूक निदान हेच परिणामकारक उपचाराचं पहिलं पाऊल आहे.