फक्त ड्रायव्हिंग जजमेंट चुकलं, तो लहान; त्याच्यासमोर शिक्षण अन् करिअरचा प्रश्न, पोर्शे प्रकरणी वकिलाचा युक्तिवाद
esakal June 24, 2025 04:45 PM

पोर्शे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला सज्ञान ठरवून त्याच्यावर खटला चालवावा अशी मागणी सरकारी वकिलांनी केलीय. विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी अल्पवयीन मुलगा हा सायंकाळी ७ वाजल्यापासून नशेत होता आणि चालकानं त्याला समजावूनही न ऐकता कार चालवण्यासाठी घेतली असा युक्तिवाद केला. सोमवारी बालन्याय मंडळात या प्रकरणी सुनावणी झाली.

अल्पवयीन मुलगा दारूच्या नशेत होता आणि तो नशेत असल्याचं बघितलेले साक्षीदार, पुरावे आहेत अशी माहिती सरकारी वकिलांनी दिली. अल्पवयीन मुलाच्या पालकांनी ससूनमध्ये रक्ताचे नमुने बदलले. हा गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे मुलाला सज्ञान समजून त्याच्यावर खटला चालवावा अशी मागणी सरकारी वकिलांनी केली.

एकतर्फी प्रेम, तरुणाच्या लग्नानंतर इंजिनिअर तरुणीचं 'धमकी कांड'; अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा, १२ राज्यांचे पोलीस लागले कामाला

सरकारी वकिलांनी केलेल्या मागणीला अल्पवयीन मुलाचे वकील प्रशांत पाटील यांनी विरोध केला. यावेळी शिवानी मित्तल विरुद्ध एनसीटी ऑफ दिल्लीच्या खटल्याचा दाखला दिला. अल्पवयीन मुलांच्या पुनर्वसनाची आवश्यकता असते. तसंच मुलाचा गुन्हेगारी हेतू नव्हता, कार चालवताना केवळ त्याचं जजमेंट चुकलं. तो लहान आहे असा युक्तिवाद करण्यात आला.

मुलगा अल्पवयीन असून त्याच्यासमोर शिक्षण आणि करिअरचा प्रश्न आहे. कलम ३०४ मध्ये कमीत कमी शिक्षा सांगितलेली नाही. त्यामुळे त्याला १८ वर्षांच्या आतील अल्पवयीन समजून वागणूक द्यावी. पोलिसांचा अर्ज रद्द करावा अशी मागणी अल्पवयीन मुलाच्या वकिलांनी केली.

Mumbai Crime : विवाहितेसोबत अनैतिक संबंध, तरुणीवर प्रेम; दोघींसोबत रहायचा एकाच घरात, महिलेच्या मुलीवरही अत्याचार

विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी न्यायालयात युक्तिवाद केला की, अल्पवयीन मुलावर कलम ३०४ आणि ४६७ अंतर्गत गुन्हा दाखल झालाय. कलम ३०४ मध्ये १० वर्षांची तर ४६७ मध्ये जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद आहे. हा गंभीर गुन्हा असल्यानं अल्पवयीन मुलाला सज्ञान समजून त्याच्यावर खटला चालवावा.

पुण्यात कल्याणीनगर परिसरात पोर्शे कार भरधाव वेगात चालवून दुचाकीला उडवलं होतं. यात दोन अभियंत्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी अल्पवयीन मुलाला न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. पण त्याच्यावर सज्ञान म्हणून खटला चालवण्यसाठी पोलिसांनी बाल न्याय मंडळाकडे अर्ज केलाय. यावर युक्तिवाद पूर्ण झाला असून १५ जुलै रोजी निर्णय होण्याची शक्यता आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.