UP Shocking Relationship Case : उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातील राधा नगर पोलिस स्टेशन हद्दीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका तरुणानं आपल्या पत्नीवर पाच लग्न केल्याचा गंभीर आरोप करत तक्रार दाखल केली आहे. या आरोपांनुसार, सध्या संबंधित महिला आपल्या भावासोबत अनैतिक संबंध (Immoral Relationship) ठेवत असल्याचे पतीचे म्हणणे आहे.
पती, सासरच्यांना घरातून हाकललंपीडित पती पंकज अग्रहारी व्यवसायानं भाजी विक्रेता आहे. त्यानं आपल्या तक्रारीत पत्नी गुडियानं त्याला आणि त्याच्या कुटुंबाला घरातून हाकलल्याचं म्हटलं आहे. तिनं परप्रांतीय तरुणांना बोलावून धमकावल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तसेच, गुडियानं सध्या घर ताब्यात घेतलं असून ती माझ्या भावाबरोबर राहत असल्याचंही पंकजनं स्पष्ट केलंय.
इराणचा 'हा' सर्वात धोकादायक प्रकल्प, पाच देशांसाठी महाभयंकर, पाक-भारताचा समावेश आहे? हल्ला झाल्यास लाखो लोक मरतील? विवाहानंतर पत्नीचं बदललं वागणंपंकज आणि गुडियाचा विवाह १६ एप्रिल २०२४ रोजी बांदा जिल्ह्यात झाला होता. विवाहानंतर काहीच महिन्यांत गुडियाचं वागणं पूर्णपणे बदललं. पंकजच्या म्हणण्यानुसार, 'गुडियानं सर्व दागिने आणि रोख रक्कम आपल्या माहेरी पाठवली व त्याला (पतीला) घरात येऊ दिलं नाही.'
पत्नी-प्रियकराच्या छळामुळं पतीनं घेतला गळफास; महाराष्ट्र पोलिस दलाशी कनेक्शन? प्रियकरासोबतचा अश्लील व्हिडिओ पाठवला अन्.. लग्न केवळ दिखावा?पंकजचा दावा आहे की, गुडिया याआधी चार वेळा लग्न करून सासरी गेली होती. मी तिचा पाचवा पती आहे. पंकजनं तिच्यावर लग्नाला एक ‘व्यवसाय’ बनवल्याचा आरोप केला असून, प्रत्येक वेळेस लग्न करून ती पैसे व साहित्य घेऊन निघून जाते, असं त्याचं म्हणणं आहे.
Raja Raghuvanshi Case : मोबाईल चॅटमधून मोठा कट उघड; सोनमला लपवणारा लोकेंद्र तोमर कोण? आधी बॅग जाळली अन् नंतर... 'तिचा स्वीकार करायला तयार, पण...'पंकजने आपल्या तक्रारीत स्पष्ट केलं आहे, की तो अजूनही तिला स्वीकारण्यास तयार आहे; पण तिनं त्याच्या भावाशी कोणतेही संबंध ठेवू नयेत. पोलिसांनी सदर तक्रार नोंदवली असून पुढील तपास सुरू आहे.