Sitaare Zameen Par Collection : आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरूच, चित्रपट १०० कोटींच्या उंबरठ्यावर
Saam TV June 24, 2025 08:45 PM

आमिर खान सध्या त्याच्या 'सितारे जमीन पर' (Sitaare Zameen Par) चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटात आमिर खानसोबत (Aamir Khan ) जिनिलिया (Genelia) झळकली आहे. प्रेक्षकांना आमिर आणि जिनिलियाची जोडी खूप आवडली आहे. त्यामुळे चित्रपटाला देखील उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपटाची कथा प्रेक्षकांच्या मनाला भावली. सोशल मीडियावर देखील सध्या 'सितारे जमीन पर' चित्रपटाच्या गाण्यांची क्रेझ पाहायला मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Music Company (@zeemusiccompany)

'सितारेजमीन पर' चित्रपट बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली आहे. हा चित्रपट आता लवकरच 100 कोटींचा टप्पा पार करणार आहे. 'सितारे जमीन पर' हा चित्रपट 20 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात नवीन कलाकारदेखील पाहायला मिळले आहेत. यात अरूष दत्ता, गोपी कृष्ण वर्मा, संवित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भंसाली, आशीष पेंडसे, ऋषी शहानी, ऋषभ जैन, नमन मिश्रा आणि सिमरन मंगेशकर यांचा समावेश आहे. चित्रपटाने चौथ्या दिवशी किती कोटींचा गल्ला जमावला जाणून घेऊयात.

'सितारे जमीन पर' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 4

दिवस पहिला - 10.7 कोटी रुपये

दिवस दुसरा - 21.50 कोटी रुपये

तिसरा दिवस - 29.00 कोटी रुपये

चौथा दिवस - 8.50 कोटी रुपये

एकूण - 66.65 कोटी रुपये

View this post on Instagram

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

'तारे जमीन पर'

'सितारे जमीन पर' हा चित्रपट 2007 साली रिलीज झालेल्या 'तारे जमीन पर' चित्रपटाचा सीक्वल आहे. चित्रपटात आमिर खान एका बास्केटबॉल कोचच्या भूमिकेत दिसत आहे. जो दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवत आहे. 'सितारे जमीन पर' चित्रपटाचे दिग्दर्शन आर.एस. प्रसन्ना यांनी केले.

King Movie : 'पाताल लोक'चा हिरो शाहरुख खानच्या 'किंग'मध्ये झळकणार, कोणती भूमिका साकारणार?
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.