मुंबई : नुकतेच मुंबई लोकलमध्ये महिलांच्या डब्यात प्रवेश करून एका तरुणाने अश्लील कृत्य केल्याचे समोर आले होते. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. सोशल मीडियावर अशा घटनांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असताना आता पुन्हा एका बस स्थानकावर तरुणाने महिलांसमोर बसून अश्लील कृत्य केल्याचे समोर आले आहे.
एका महिलेने बसस्थानकात बसलेला एक माणूस महिलांसमोर बसून त्यांच्याकडे बघत आपल्या पॅंटवर हात फिरवून अश्लील कृत्य करत असल्याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये हा माणूस आपल्या पॅंटवर हात फिरवून प्रायव्हेट पार्टला हात लावून अश्लील कृत्य करत असल्याचे दिसत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून याबाबत संताप व्यक्त केला जात आहे. तसेच या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
नेमकं प्रकरण काय?एक माणूस आपल्या पॅंटवर हात फिरवून प्रायव्हेट पार्टला हात लावून अश्लील कृत्य करत असल्याचे महिलेने म्हटले आहे. व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये महिलेने सविस्तर घटना सांगितली आहे. “मी पूर्णपणे कुर्ती, लेगिंग्ज आणि शाल घालून भारतातल्या आणि आशियातल्या सर्वात मोठ्या बसस्थानकात बसले होते.
तेव्हा अचानक एक माणूस तिथे येऊन काही महिलांसमोर जाऊन बसला आणि घाणेरडं कृत्य करू लागला. हा माणूस बिनधास्तपणे त्याच्या प्रायव्हेट पार्टवर हात फिरवून इतर महिलांकडे बघत होता. एखादी महिला उठल्यानंतर तो दुसऱ्या महिलेकडे बघायचा. त्यानंतर तिच्यासमोर जाऊन तेच घाणेरडं कृत्य करायचा, असे महिलेने म्हटले आहे.
त्याचपुढे 'हे एकदाच झालं असतं तर ठीक, पण तो घाणेरड्या हेतूनं पुन्हा तसंच करत होता. थोड्या वेळाने तो माझ्यासमोर येऊन बसला. सुरुवातीला मला काही कळलंच नाही, पण लक्ष गेल्यावर मला खूपच त्रास झाला. त्याच वेळेला एक पोलीस ऑफिसर माझ्या जवळून गेला होता. मग मी लगेच उठले आणि त्याच्यापासून दूर जाऊन पोलिसांना शोधू लागले.
Palghar News: निकणे गावचा ५० वर्ष जुना पूल धोकादायक, ग्रामस्थांचा प्रवास ठरतोय जीवघेणा; प्रशासनाचे दुर्लक्षमात्र यानंतरही तो माणूस इतर महिलांजवळ जाऊन तसंच वागत राहिला. त्याने खूप महिलांना टार्गेट केलं होतं. त्यावेळी मी ठरवलं की, मी गप्प बसणार नाही. मी त्याच्यावर लक्ष ठेवत राहिले आणि जवळच्या दुकानात जाऊन विचारलं, “इथे पोलीस कुठे असतील?” त्यांनी काळजीपूर्वक विचारलं, काय झालं आहे. मी दुकानदाराला सांगितलं तेवढ्यात त्याने पाहिलं की मी त्याच्याकडे बोट दाखवत आहे, आणि तो लगेच पळून गेला.
इतक्यात मला तो पोलीस ऑफिसर पुन्हा दिसला. मी त्याच्याकडे धाव घेतली आणि सगळं स्पष्ट सांगितलं. त्याने एक क्षणही न घालवता माझ्यासोबत आला. पण तोपर्यंत तो माणूस निघून गेला होता. मी त्याचं नीट वर्णन दिलं – गुलाबी शर्ट घातलेला माणूस, जो महिलांसमोर अश्लील आणि घाणेरडं कृत्य करत होता. पोलिसांनी मला आश्वासन दिलं, तो सुटणार नाही, आम्ही शोध घेऊ आणि त्याच्यावर कारवाई करू. जाताना त्यांनी मला आपला नंबर दिला आणि सांगितलं, अशा प्रकारची कुठलीही अडचण झाली, तर मला लगेच कॉल करा.
पण आता हे रोजचं झालं आहे. स्त्रिया घराबाहेर असो घरात कुठेच सुरक्षितता उरलेली नाही. आपण सगळ्यांनीच हे अनुभवलेलं आहे. जोपर्यंत देशात कडक कायदे आणि कठोर शिक्षा होणार नाही, तोपर्यंत अशा घटना थांबणार नाहीत.” असेही महिलेने म्हटले आहे. दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, हे अद्याप कळू शकले नाही.
View this post on InstagramA post shared by PAviS voice official (@pavis__voice_official)
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं की, “हा व्हिडिओ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन दाखवा आणि तक्रार करा.” तर दुसऱ्याने “तिथल्या तिथे त्याला दोन कानाखाली द्यायला हवी होती” अशी कमेंट केली आहे.