मालेगाव शुगर फॅक्टरी निवडणुकीचा निकाल 2025: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या रिंगणात शिवाजी कोकरे हे उमेदवार म्हणून उभे राहिले होते. शिवाजी कोकरे यांनी आतापर्यंत 35 वेळा माळेगावची निवडणूक लढवली आहे. त्यांचा एकदाही विजय झाला नाही पण प्रत्येकवेळी ते हिंमत न हरता निवडणुकीला उभे राहत आले. त्यामुळे माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आली की, शिवाजी कोकरे (Shivaji Kokare) यांचे नाव हमखास चर्चेत असते. शिवाजी कोकरे यांचा उद्देश आहे की, लोकशाही (Democracy) जिवंत राहिली पाहिजे. आतापर्यंत 1992 पासून जेवढ्या निवडणुका झाल्या त्या बिनविरोध नाही झाली पाहिजे हीच शिवाजी कोकरे यांची भूमिका आहे. सत्तेपुढे पुढे माझा टिकाव लागणार नाही मला माहिती आहे मात्र तरी देखील शिवाजी कोकरे निवडणूक लढवत आहेत. शिवाजी कोकरे यांनी आतापर्यंत 35 निवडणुका लढला असल्याचं कोकरे सांगतात. लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत आणि कारखाना अशा निवडणुका आतापर्यंत कोकरे लढले आहेत. शिवाजी कोकरे यांच्याशी बातचीत केले आहे आमचा प्रतिनिधी जयदीप भगत यांनी
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या नीलकंठेश्वर पॅनेलला मोठे यश मिळताना दिसत आहे. अजित पवार यांनी या निवडणुकीच्या प्रचारात माळेगाव कारखान्याला 500 कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे अजित पवार माळेगाव कारखान्याच्या 21 जागांपैकी किती जागा जिंकणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. मंगळवारी मतमोजणीच्या पहिल्या दिवशी ब प्रवर्गातून अजित पवार विजयी झाले होते. त्यानंतर बुधवारी दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजल्यापासून मतमोजणीला पुन्हा सुरुवात झाली होती. यावेळी अजित पवार यांचे दोन उमेदवार विजयी झाले.
अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून निळकंठेश्वर पॅनलचे उमेदवार रतन कुमार साहेबराव भोसले विजयी झाले आहेत . तावरे गटाचे बापूराव आप्पा गायकवाड पराभूत झाले आहेत. रतन कुमार साहेबराव भोसले यांनी 1487 मतांनी बापूराव आप्पा गायकवाड यांचा पराभव केला. तर इतर मागासवर्गीय प्रवर्गातून अजित पवारांच्या पॅनलचे नितीन शेंडे 8494 मतं मिळवून विजयी झाले. त्यांनी सहकार बचाव पॅनलचे रामचंद्र नाळे यांचा 1153 मतांनी पराभव केला. त्यांना 7341 मतं मिळाली. त्यामुळे आतापर्यंत अजित पवार यांच्या पॅनलचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. आज दुपार किंवा संध्याकाळपर्यंत माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
https://www.youtube.com/watch?v=n9rzum15xoi
आणखी वाचा
माळेगाव कारखान्याच्या मतमोजणीत तावरेंच्या पॅनलला मोठा धक्का, अजित पवारांचा आणखी एक उमेदवार विजयी
आणखी वाचा