सागर निकवाडे
नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. यामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. दरम्यान तळोदा शहर व परिसरात देखील काल पावसाची संततधार सुरु होती. या पावसामुळे घराची कमकुवत झालेली घराची भिंत कोसळली. यावेळी घरात असलेले पती- पत्नी भिंतीखाली दबले गेल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नंदुरबारजिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मागील ४८ तासांपासून सातपुड्यात पावसाचा कहर पाहण्यास मिळत असून नदी- नाल्यांना देखील पूर आला आहे. दरम्यान जोरदार पावसामुळे काही ठिकाणची शेतजमीन वाहून गेल्याचे पाहण्यास मिळत आहे. तर तळोदा, अक्कलकुवातालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून पावसाची संततधार सुरु आहे. यामुळे अक्कलकुवा तालुक्यातील वान्याविहीर गावात पावसाचं पाणी शिरले आहे.
Thane Tourism : पावसाळी पर्यटनावर बंदी; रोजगारावर गदा आल्याने आदिवासी बांधवांची शासनाकडे याचनाभिंत कोसळून पती- पत्नी जखमी
तळोदाशहर व परिसरात पावसाची संततधार सुरु आहे. या संततधार पावसामुळे कमकुवत झालेली घराची भिंत अचानक कोसळली. यावेळी घरात पती आणि पत्नी असे दोघेच होते. भिंत कोसळल्याने दोघे जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत चुनिलाल सुभान सोनवणे आणि त्यांची पत्नी केवळाबाई सोनवणे अस जखमी पती-पत्नीचे नाव असून जखमी पती- पत्नीला तळोदा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
Buldhana : फंगल इन्फेक्शची अनेकांना लागण; दररोज होतेय ३५ रुग्णांची नोंदवाण्याविहीर गावात शिरले पाणी
मुसळधार पावसाने नंदुरबार जिल्ह्यात हाहाकार माजविला आहे. दरम्यान अक्कलकुवा तालुक्यातील वान्याविहीर गावात पावसाचं पाणी शिरले आहे. मुसळधार पावसामुळे गावात नदीचे स्वरूप आले असून संपूर्ण गावात ५ फुटापर्यंत पावसाचं पाणी साचले असून घरांमध्ये देखील पाणी गेले आहे. झोपडीत पाणी शिरल्याने गरीब कुटुंबीय हतबल झाले आहेत. घरात पाणी शिरलाने संसार उपयोगी साहित्य पाण्यात भिजले आहे.