मोदींनी पेरणीसाठी दिले 6000 रुपये, तुझ्या अंगावरचे कपडे अन् पायातील चप्पल सरकारमुळेच; भाजप आमदाराचे शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य
Marathi June 26, 2025 02:24 AM

भारतीय जनता पक्षाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यासह पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सरकारला ट्रोल करणाऱ्यांवर टीका करताना लोणीकरांची जीभ घसरली, आणि त्यांच्या वक्तव्याने शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली आहे.

जालना जिल्ह्यातील परतुर एक कार्यक्रमात बोलताना बबनराव लोणीकर म्हणाले आहेत की, “कुचरवट्यावर बसलेली काही रिकामटेकडी कार्टी सोशल मीडियावर मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचे अंधभक्त असल्याचे लिहितात. याच कूचवट्यावर बसून सोशल मीडियावर चर्चा करणाऱ्या कार्ट्यांच्या माईचा पगार आणि बापाची पेन्शन बबनराव लोणकर यांनीच केला आहे. तर नरेंद्र मोदींनी तुझ्या बापाला सहा हजार रुपये पेरणीला दिले आहेत, तुझ्या अंगावरचे कपडे, पायातील बुट-चप्पल सुद्धा सरकारमुळेच आहे.”

याधीही एका सभेत बोलताना ग्रामस्थांना इशारा देत बबनराव लोणीकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले होते की, “पाच वर्षांमध्ये कमळाचं एक बटन दाबायचं तेही केलं नाही. मी गावाला 8 कोटींचा सिमेंट रोड दिला. मला मत द्या किंवा नका देऊ. मी दोन-तीन वेळेस चव पाहणार, नाहीतर गावावर फुली मारणार.”

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.