42 वर्षांपूर्वी 1983 मध्ये कपिल देवच्या हातात विश्वचषक देणारा व्यक्ती कोण होता? जाणून घ्या एका क्लिकवर
Marathi June 26, 2025 05:24 AM

1983 विश्वचषक: 1983 मध्ये भारताने कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली विश्वचषक जिंकून इतिहास रचला होता. आज या क्षणाला 42 वर्षे पूर्ण झाली आहेत. आज, *25 जून) रोजी 1983 मध्ये भारतीय क्रिकेटसाठी तो अभिमानास्पद क्षण आला होता. कपिल देव विश्वचषक ट्रॉफी उंचावताना पाहून प्रत्येकाच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. पण तुम्हाला माहीत आहे का की, कपिल देव यांना विश्वचषक ट्रॉफी देणारी व्यक्ती कोण होती? 1983च्या विश्वचषकाच्या या व्हायरल फोटोमध्ये कपिल देव यांच्यासोबत कोण आहे, चला तर मग जाणून घेऊयात. (Who gave World Cup trophy to Kapil Dev)

भारताचे पहिले कर्णधार ज्यांनी देशाला क्रिकेटमध्ये विश्वविजेता बनवले, त्यांच्या हातात विश्वचषक ट्रॉफी असलेला फोटो तुम्ही अनेक वेळा पाहिला असेल, पण आजही 42 वर्षांनंतरही असे अनेक लोक आहेत, ज्यांना हे माहीत नसेल की कोणत्या व्यक्तीने विश्वचषक विजेत्या संघाला ती ट्रॉफी दिली होती. भारताने 1983 चा विश्वचषक फायनल जिंकल्यानंतर, प्रुडेंशियल एश्युरन्सचे चेअरमन रॉबर्ट कॅर यांनी कपिल देव यांच्या हातात विश्वचषक ट्रॉफी दिली होती. प्रुडेंशियल 1983 च्या विश्वचषक स्पर्धेचे मुख्य प्रायोजक होते, यामुळेच या विमा कंपनीच्या चेअरमनने विश्वचषक विजेत्या कर्णधाराच्या हातात ट्रॉफी दिली होती. (Robert Carr Prudential Assurance)

1983च्या विश्वचषकात भारतीय क्रिकेट संघ पहिल्यांदाच या स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचू शकला होता. तर भारताचा सामना मागील 2 वेळा विश्वविजेत्या ठरलेल्या वेस्ट इंडिजसोबत होता. वेस्ट इंडिज सलग तिसऱ्यांदा विश्वचषकाच्या फायनलमध्ये पोहोचला होता. पण भारताने वेस्ट इंडिजला विश्वविजेतेपदाची हॅटट्रिक करू दिली नाही. या फायनलमध्ये वेस्ट इंडिजने टाॅस जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. ज्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय संघाने 183 धावा केल्या. यानंतर भारतीय गोलंदाजांनी वेस्ट इंडिजला 140 धावांवरच ऑल आउट केले आणि भारताने पहिल्यांदाच क्रिकेट विश्वचषक आपल्या नावावर केला. त्यामुळे हा क्षण भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहीला गेला. (Legendary moments in Indian cricket)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.