IND vs ENG: इतिहास रचण्यासाठी जो रूट सज्ज! तेंडुलकरचा 'हा' वर्ल्ड रेकाॅर्ड याच मालिकेत मोडणार?
Marathi June 26, 2025 11:31 AM

भारत वि इंग्लंड कसोटी मालिका: सध्या भारत विरूद्ध इंग्लंड संघात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. त्यातील पहिला सामना लीड्सच्या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात इंग्लंडने भारताचा 5 गडी राखून पराभव केला. दरम्यान या सामन्यात इंग्लंडचा दिग्गज जो रूटने देखील दमदार अर्धशतक झळकावत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. यादरम्यान त्याने सचिन तेंडुलकरच्या एका मोठ्या रेकाॅर्डकडे वाटचाल केली आहे.

सचिन तेंडुलकरने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत असे अनेक रेकाॅर्ड केले आहेत, जे अजूनही अभेद्य आहेत. मात्र, आता त्यापैकी काही रेकाॅर्ड मोडण्याच्या मार्गावर आहेत. असाच एक सचिनचा विश्वविक्रम इंग्लंडचा जो रूट आता मोडण्याच्या तयारीत आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या याच कसोटी मालिकेत हा रेकाॅर्ड मोडला जाईल, अशी शक्यता आहे. तसेच, जो रूट आता वेस्ट इंडीजचा दिग्गज फलंदाज शिवनारायण चंद्रपॉलच्या बरोबरीत पोहोचला आहे. लवकरच तो सचिनला मागे टाकू शकतो. (Joe Root Sachin Tendulkar Record)

खरे तर, कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करण्याचा रेकाॅर्ड सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्याने 51 शतके झळकावली आहेत, जिथे अजून कोणीही पोहोचू शकले नाही. हा रेकाॅर्ड अजून काही वर्षे अभेद्य राहील. याच्या आसपास कोणीही नाही. इतकेच नाही, तर सचिन तेंडुलकरने कसोटीत सर्वाधिक अर्धशतके करण्याचा रेकाॅर्डही आपल्या नावावर केला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये 51 शतकांव्यतिरिक्त सचिन तेंडुलकरने 68 अर्धशतके झळकावली आहेत. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर वेस्ट इंडीजचा शिवनारायण चंद्रपॉल आहे, ज्याने 66 अर्धशतके झळकावली आहेत. आता जो रूटही त्याच्या बरोबरीत पोहोचला आहे. (Sachin Tendulkar Test Records)

जो रूटने भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात आपले अर्धशतक पूर्ण केले. तो शेवटपर्यंत नाबाद राहिला. कसोटी क्रिकेटमधील त्याचे हे 66 वे अर्धशतक होते. आता तो सचिन तेंडुलकरच्या या रेकाॅर्डशी बरोबरी करण्यापासून फक्त 2 अर्धशतके दूर आहे आणि सचिनचा रेकाॅर्ड मोडण्यासाठी त्याला फक्त 3 अर्धशतके हवी आहेत. (Joe Root Test Half-Centuries)

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा 50 पेक्षा जास्त धावा करण्याच्या बाबतीतही सचिन तेंडुलकरच पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने 200 कसोटी सामने खेळून 111 वेळा 50 पेक्षा अधिक धावा करण्यात यश मिळवले आहे. दुसऱ्या क्रमांकावर जॅक कॅलिस आहे, ज्याच्या नावावर 103 वेळा 50+ धावा आहेत. रिकी पॉन्टिंगबद्दल बोलायचे झाल्यास, तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 103 वेळा 50 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. जो रूट सध्या या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. (Joe Root 50+ Scores Test)

जो रूटने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये 102 वेळा 50 पेक्षा जास्त धावांची खेळी केली आहे. जर भारतावि रुद्धच्या येणाऱ्या कसोटी सामन्यांमध्ये जो रूटने 50 ते 99 धावांच्या दरम्यानची खेळी 3 वेळा केली, तर तो सर्वाधिक अर्धशतकांच्या बाबतीत सचिन तेंडुलकरला मागे टाकेल. त्याचबरोबर, सर्वाधिक वेळा 50 पेक्षा जास्त धावा करण्याच्या बाबतीतही रिकी पॉन्टिंग आणि जॅक कॅलिसला मागे टाकून दुसऱ्या क्रमांकावर पोहोचेल. भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेत अजून 4 सामने बाकी आहेत. आता जो रूट कधीपर्यंत हा रेकाॅर्ड आपल्या नावावर करतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. (Most Half-Centuries in Test Cricket)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.