नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर जवळ बह्मगिरी पर्वतावर कडा कोसळला असून 3 भाविक जखमी झाले आहेत.
Mumbai Live : मुंबईत अरबी समुद्रात दुपारी 4.75 मीटरच्या लाटा उसळणारमुंबईत अरबी समुद्रात दुपारी 4.75 मीटरच्या लाटा उसळणार असून नागरिकांनी समुद्र किनारी जावू नये असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.
Pune Live : पुण्यात वारकऱ्याच्या अंगावर मांसाचा तुकडा फेकला, महिलेविरुद्ध गुन्हामांसाचा तुकडा अंगावर फेकल्याची तक्रार एका वारकऱ्याने केली होती, यानंतर लष्कर पोलिसांनी एका महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Pune Live : पुण्यात स्वच्छतागृहाजवळ डबक्यात आढळले अर्भकपुण्यातील विमान नगर परिसरातील धक्कादायक घटना. ७ महिन्यांचे स्त्री जातीचे मृत अर्भक टाकून दिल्याची धक्कादायक घटना. विमानतळ पोलिसांनी एका संशयित महिलेला घेतलं ताब्यात
Nagpur Live : नागपूरमध्ये मुसळधार पावसाने सखल भागात साचले पाणी, नागरिकांची तारांबळनागपुरात काल रात्री झालेल्या दमदार पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये सखल पाणी साचले यामुळे जनजीवन विस्कळित झाले असून नागरिकांची तारांबळ उडाली आहे. या पावसामुळेमहानगरपालिकेकडून दावा करण्यात येत असला तरी नालीसफाईचीही पोलखोल झाली आहे.