टिव्ही इंडस्ट्री गाजवणारी अभिनेत्री रिद्धिमा पंडितने (Ridhima Pandit) अभिनयाच्या जोरावर लोकप्रियता मिळवली आहे. तिचा मोठा चाहता वर्ग आहे. तिच्या सौंदर्याचे चाहते दिवाने आहेत. ती कायम इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या लूकचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. कालच (25 जून) रिद्धिमा पंडितचा वाढदिवस झाला. काल रिद्धिमा 35 वर्षांची झाली आहे. आपल्या 35व्या वाढदिवसाला मोठा निर्णय घेतला आहे. याची खास पोस्ट तिने सोशल मीडियावर केली आहे.
View this post on InstagramA post shared by Ridhima Pandit (@ridhimapandit)
अभिनेत्री रिद्धिमा पंडितने मृत्यूनंतर नेत्रदानकरण्याचा निर्णय घेतला आहे. तिच्या पश्चात तिचे डोळे गरजू व्यक्तीला दान करण्यात येणार आहे. यासंबंधित तिने एक पोस्ट शेअर केली आहे. तिने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. ज्यात आय डोनर कार्ड आणि सर्टिफिकेट दिसत आहे. या फोटोंना तिने खूपच खास कॅप्शन दिलं आहे. रिद्धिमाच्या या पोस्टवर चाहते आणि कलाकारांकडून भरपूर प्रेमाचा, कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
रिद्धिमा पंडित पोस्ट"मी आतापर्यंत केलेल्या सर्व स्वाक्षऱ्यांपैकी, मला सर्वात जास्त अभिमान अवयवदान कार्डवर केलेल्या स्वाक्षरीचा आहे. आज वाढदिवसानिमित्त मी एक छोटेसे पाऊल उचलले आहे. मी माझे डोळे दान करण्याचे वचन दिले आहे. जे एक दिवस दुसऱ्याचे जग उजळवू शकते. दृष्टी ही एक देणगी आहे आणि ती माझ्यानंतरही टिकू शकते हा विचार नम्र आणि आशादायक आहे. मला खरोखर विश्वास आहे की अवयवदान ही केवळ वैयक्तिक निवड नाही. ती एक जबाबदारी आहे जी आपण सर्वजण मानव म्हणून सामायिक करतो. तुम्ही सुद्धा एखाद्याला पुन्हा सूर्योदय पाहण्याचे कारण व्हा."
View this post on InstagramA post shared by Ridhima Pandit (@ridhimapandit)
रिद्धिमा पंडितने आजवर अनेक मालिकां आणि वेब सीरिजमध्ये काम केले आहे. तिला 'बहू हमारी रजनीकांत' या शोमुळे खूप लोकप्रियता मिळाली. तिने 'बिग बॉस ओटीटी', 'खतरा खतरा' मध्ये देखील झळकली होती. तिच्या आगामी प्रोजेक्टची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
Fatima Sana Shaikh : विमानातच बिघडली तब्येत अन् अचानक येऊ लागले झटके; फातिमा सनानं सांगितला धक्कादायक किस्सा