Sujay Vikhe : आपधूपच्या विकासाची माझी जबाबदारी : डॉ. विखे; ग्राममहोत्सवानिमित्ताने विकास कामांचा प्रारंभ
esakal June 26, 2025 07:45 PM

पारनेर : आपधूप गाव वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ असून, हे गाव कायमच विखे पाटील परिवाराबरोबर राहिले आहे. त्या मुळे या गावाच्या विकासाची जबाबदारी माझी आहे. म्हणून सुपे-आपधूप साडेतीन तीन किलोमीटर रस्त्याच्या डांबरीकरणाचा प्रश्न पालकमंत्र्यांच्या माध्यमातून सोडवणार असल्याचे स्पष्ट प्रतिपादन माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले.

अहिल्यानगर हादरलं! आठवीतील विद्यार्थ्याकडून दहावीतील विद्यार्थ्याचा खून; दुपारच्या सुट्टीत 'या' कारणावरुन भांडण अन्....

आपधूप ग्राम परिवारातर्फे युवा उद्योजक पंकज गवळी व योगेश गवळी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आपधूप ग्राममहोत्सव कार्यक्रमानिमित्ताने ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार काशिनाथ दाते होते. यावेळी निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांचे कीर्तन झाले. उद्योजक सुरेश गवळी यांच्या योगदानातून रक्तदान शिबिर, पाचशे गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, दोन हजार फळझाडांच्या रोपांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गावातील सात कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या हस्ते झाला. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष राहुल शिंदे, देवस्थानचे उपाध्यक्ष संतोष गवळी, ब्रिजेश बोरुडे यांनी मनोगत व्यक्त केले.

विश्वनाथ कोरडे, विक्रमसिंह कळमकर, प्रशांत गायकवाड, भाऊसाहेब बोठे, सागर मैड, विजू औटी, सुनील थोरात, सचिन वराळ, अश्विनी थोरात, दिनेश बाबर, मनोज मुंगसे, उत्तम पठारे आदी उपस्थित होते.

जुन्नर तालुका हादरला! 'जुन्नरमधील कोकण कड्यावरून उडी मारून दोघांनी संपवले जीवन'; रूपालीने मृत्यूपूर्वी लिहीली चिठ्ठी..

आपधूपचे खंडेश्वर देवस्थान अनेक गावांचे कुलदैवत आहे. देवस्थानाच्या विकासासाठी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात ‘ब’ वर्ग दर्जा देण्यासाठी प्रयत्न केला जाईल, तसेच युवकांच्या रोजगारासंबंधीचे ‘एमआयडीसी’तील प्रश्नही मार्गी लावणार.

-काशिनाथ दाते, आमदार.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.