Pinga Ga Pori Pinga : वल्लरीच्या सासूबाईंनी पिंगा गर्ल्सना दिलं चॅलेंज, पाहा VIDEO
Saam TV June 26, 2025 08:45 PM

मैत्री, स्वप्नं आणि संघर्ष यांचा संगम असलेली 'पिंगा गं पोरी पिंगा' (Pinga Ga Pori Pinga) ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. 'पिंगा गं पोरी पिंगा' मालिकेला प्रेक्षकांची भरपूर पसंती मिळत आहे. मालिकेने आता 200 भागांचा टप्पा पार केला आहे. आता मालिकेत एक नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. वल्लरीची सासू इंदुमती पुन्हा एकदा मनोज आणि वल्लरीमध्ये फूट पडण्यासाठी थेट मुंबईत आली आहे. त्यामुळे मालिकेने आता नवीन वळण घेतले आहे.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

मनोज आणि वल्लरीच्या संसाराची स्वप्नं आता साकार होण्याच्या उंबरठ्यावर असतानाच वल्लरीची सासूइंदुमती तिच्यावर नवीन निर्बंध लादण्याचा निर्णय घेते. "भामरेंची सून ड्रेस घालणार नाही." असं ठणकावून सांगत इंदुमती वल्लरीचे कपडे लपवणार आहेत. तर पुढे वल्लरीची सासू पिंगागर्ल्सना चॅलेंज देते की, "एका तासात कपडे शोधा, अन्यथा वल्लरीला आयुष्यभर साडी नेसावी लागेल" आता पिंगा गर्ल्स हे चॅलेंजपार करू शकतील का? वल्लरी आपल्या इच्छांवर ठाम राहील का? हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

'पिंगा गं पोरी पिंगा' मालिकेत वल्लरीची सासू आता मनोज आणि वल्लरीकडे आली असून तिचा हेतू या दोघांमध्ये फूट पाडणे आहे. तिचा मुळातच त्यांच्या नात्याला विरोध आहे. नाते तोडण्यासाठी ती मुंबईला आली आहे. मनोजला त्याची आई नको असली तरीही वल्लरीने घातलेल्या अटीमुळे तो त्याच्या आईला घरात राहण्यास परवानगी देतो. तेव्हापासून इंदुमती वल्लरीला त्रास देण्याला सुरुवात होते.

'पिंगा गं पोरी पिंगा' मालिका संध्याकाळी 7.30 वाजता कलर्स मराठीवर पाहायला मिळते.

Harshvardhan Rane : परीक्षा द्यायला गेलेला हर्षवर्धन राणे अडकला मुलींच्या गराड्यात, पाहा VIDEO
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.