पिंपरी, ता. २७ ः भटके, मोकाट आणि मृत पाळीव श्वान, मांजर अशा छोट्या प्राण्यांसाठी महापालिकेने नेहरूनगर येथे (डॉग पॉण्ड) दहन यंत्र स्थापित केले आहे. सद्यःस्थितीत प्राणी दहन सेवा सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू आहे. गुरुवारपासून (ता. २६) मृत प्राणी दहन वेळेत बदल केला आहे. त्यानुसार सकाळी आठ ते रात्री १० वाजेपर्यंत छोटे प्राणी दहन करण्याची व्यवस्था केली आहे. याची शहरातील सर्व पशुपालक व प्राणीप्रेमींनी नोंद घ्यावी, असे आवाहन महापालिका पशुवैद्यकीय विभागाने केले आहे.
---