Maharashtra Politics : हिंमत असेल तर गुजराती भाषेला अभिजात दर्जा मिळवून दाखवा: संदीप देशपांडे
Sarkarnama June 28, 2025 05:45 AM
MNS News : मनसेकडून भाजपवर जोरदार हल्ला

अभिजात भाषा म्हणजे मुळ भाषा असा त्याचा अर्थ होतो. एखाद्या भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी ती भाषा समृद्ध असावी लागते, त्या भाषेतील साहित्य समृद्ध असावे लागते, त्या भाषेला इतिहास हवा, या अटी पूर्ण केल्याशिवाय कोणीही कोणत्याही भाषेला अभिजात दर्जा देऊ शकत नाही. मग नरेंद्र मोदी असो की डोनाल्ड ट्रम्प असो. हिमंत असेल तर गुजराती भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दाखवा, असे आव्हान मनसे नेते संदीप देशपांडे यांनी भाजपला केले. मनसेने अभिजात भाषेच्या दर्जावरून भाजपवर जोरदार हल्ला केला आहे.

Eknath Shinde :उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; नाशिकच्या बड्या नेत्यासह आठ माजी नगरसेवक करणार शिंदे गटात प्रवेश

नाशिक येथील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर आठ दिवसातच उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्यासह आठ माजी नगरसेवक रविवारी शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थित प्रवेश करणार आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.