मुंबई : काटा लगा गर्ल आणि बिग बॉस १३ मधील प्रसिद्ध असलेली अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे वयाच्या ४२ व्या वर्षी निधन झाले असल्याची बातमी समोर आली आहे. २७ जून रोजी रात्री शेफालीला हृदयविकाराचा झटक्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे मनोरंजन उद्योगासह तिच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २७ जून रोजी रात्रीच्या सुमारास काटा लगा गर्ल आणि बिग बॉस १३ फेम शेफाली जरीवाला हिला हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर तिला तातडीने बेलेव्ह्यू मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तत्पूर्वी तिला मृत घोषित करण्यात आले.
सरकारी नोकरी करणारे 'हे' खेळाडू वर्षभर खेळतात क्रिकेट, पण त्यांना इतक्या सुट्ट्या कशा मिळतात?ज्येष्ठ चित्रपट समीक्षक विकी लालवानी यांच्या इन्स्टाग्राम पेजवरून शेफाली जरीवालाच्या मृत्यूची पुष्टी करण्यात आली आहे. असे म्हटले आहे की शेफालीचा पती तिला अंधेरी येथील बेलेव्ह्यू रुग्णालयात घेऊन आला होता. परंतु डॉक्टर तिच्यावर उपचार सुरू करण्यापूर्वीच शेफालीचा मृत्यू झाला होता. त्यांनी या संदर्भात रुग्णालयाचे प्रमुख डॉ. विजय लुल्ला यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. नंतर, रुग्णालयातील दुसरे डॉक्टर सुशांत यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. शेफालीने ३ दिवसांपूर्वी एक फोटोशूट देखील केले होते.
कोण आहे शेफाली जरीवाला?शेफाली जरीवाला तरुणांमध्ये खूप लोकप्रिय होती. तिचा जन्म अहमदाबादमध्ये झाला. २००२ मध्ये तिने आशा पारेख यांच्या चित्रपटातील कांता लगा या गाण्याचा म्युझिक व्हिडिओ रिक्रिएट केला. हे गाणे 'मुझसे शादी करोगी' या चित्रपटात वापरले गेले होते. युट्यूबवर त्याला सुमारे १०० दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. जेव्हा हे गाणे रिलीज झाले तेव्हा त्याला खूप लोकप्रियता मिळाली आणि विरोधालाही सामोरे जावे लागले. शेफालीचा हा व्हिडिओ इतका हिट झाला की तिला स्वतःला 'काता लगा गर्ल' असे संबोधले जाऊ लागले. तिने सलमान खानच्या लोकप्रिय शो 'बिग बॉस १३' मध्येही भाग घेतला. तिने तिच्या कारकिर्दीतील एकमेव हिंदी चित्रपट 'मुझसे शादी करोगी' केला. त्याच वेळी ती 'हुडुगारू' नावाच्या कन्नड चित्रपटाचा भाग होती.
दरम्यान, शेफाली हिच्या निधनामुळे टीव्ही सेलिब्रिटी अली गोनी, राजीव अदातिया आणि इतरांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून शोक व्यक्त केला. अली गोनी यांनी एक पोस्ट शेअर केली आणि लिहिले, "आरआयपी." दुसरीकडे राजीव अदातिया यांनी लिहिले, "हे खूप दुःखद आहे."
View this post on InstagramA post shared by Vickey Lalwani (@iamvickeylalwani)