INDW vs ENGW T20 : शतकी खेळीसह स्मृती मंधानाने नोंदवला असा विक्रम, झालं असं की…
GH News June 28, 2025 11:06 PM

भारत आणि इंग्लंड महिला संघात पहिला टी20 सामना सुरु आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल गमवल्याने भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. या सामन्यात हरमनप्रीत कौर दुखापतीमुळे खेळत नाही. त्यामुळे कर्णधारपदाची धुरा स्मृती मंधानाच्या खांद्यावर आहे. स्मृती मंधानाने कर्णधारपदाला साजेशी कामगिरी केली. इंग्लंडच्या गोलंदाजांना फोडून काढलं. स्मृती मंधानाने शफाली वर्मासह पहिल्या विकेटसाठी 77 धावांची भागीदारी केली. त्यानंतर स्मृती मंधानाने 51 चेंडूत शतक पूर्ण केलं. या खेळीत तिने 14 चौकार आणि तीन षटकार मारले. यावेळी तिचा स्ट्राईक रेट 194.3 चा होता. भारताकडून टी20 क्रिकेटमध्ये शतक ठोकणारी दुसरी महिला क्रिकेटपटू ठरली आहे. यापूर्वी अशी कामगिरी कर्णधार हरमनप्रीत कौर हीने केली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक करणारी सातवी फलंदाज ठरली आहे.

वेस्ट इंडिजच्या डॉटीनने 2010 मध्ये पहिलं शतक ठोकलं होतं. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या मेग लेनिंगने 2014 मध्ये 126 धावा, हरमनप्रीत कौरने 2018 मध्ये 103 धावा, इंग्लंडच्या हीथर नाईटने 2020 मध्ये 108 धावा, दक्षिण अफ्रिकेच्या लीने 2020 मध्ये 101 आणि पाकिस्तानच्या मुनीब अलीने 2023 मद्ये 102 धावा केल्या होत्या. आता या यादीत स्मृती मंधानाची भर पडली आहे. टी20 करिअरमधील स्मृती मंधानाचं हे पहिलं शतक आहे. यासह तिन्ही फॉर्मेटमध्ये शतक ठोकणारी पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे.

बातमी अपडेट होत आहे

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.