Shefali Jariwala : शेफाली जरीवालाची 'ती' शेवटची इच्छा काय होती? स्वत: केला होता खुलासा
Saam TV June 28, 2025 11:45 PM

Shefali Jariwala चे वयाच्या ४२ व्या वर्षी निधन झाले. शुक्रवार २७ जून रोजी रात्री अभिनेत्रीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. शेफाली जरीवालाच्या निधनाची माहिती समोर आल्यानंतर मनोरंजनसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. कांटा लगा या म्युझिक व्हिडीओमुळे शेफालीला प्रसिद्धी मिळाली होती. कांटा लगा गर्ल अशी ओळख तिला मिळाली होती.

२०२४ मध्ये शेफाली जरीवालाने पारस छाब्राच्या पॉडकास्ट चॅनलला भेट दिली होती. तेव्हा शेफालीने पारससोबत अनेक मुद्द्यांवर चर्चा केली होती. शेफालीने कांटा लगा या म्युझिकल व्हिडीओमुळे मिळालेल्या प्रसिद्धीवर मनमोकळेपणाने संवाद साधला. दहा महिन्यांपूर्वी पारस छाब्राच्या पॉडकास्टवर शेफालीने तिची इच्छा व्यक्त केली होती.

Team Indiaच्या नेट प्रॅक्टिसदरम्यान WWE! दोन खेळाडू फिल्डिंग कोचला भिडले, नेमकं काय झालं? पाहा Viral Video

पारसने शेफालीला तिच्या 'कांटा लगा' गाण्याशी संबंधित काही प्रश्न विचारले होते. 'सगळे तुला कांटा लगा गर्ल नावाने हाक मारतात. तू कुठेही गेलीस की त्या गाण्यावरुन तुझी ओळख सांगतात. बिग बॉसमध्येही तुला कांटा लगा गर्ल म्हटले जात होते. आता इतकी वर्ष झाली, तर तुला कांटा लगाचा कंटाळा आला नाही का?' असे पारसने म्हटले.

Gautam Gambhir : तुला हवे, ते खेळाडू दिले... आता अपेक्षित निकाल दे अन्यथा... ! गौतम गंभीरला मिळालीय वॉर्निंग

पारसच्या प्रश्नाचे उत्तर देताना शेफाली जरीवाला म्हणाली होती, 'कंटाळा येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. एक कलाकाराला ओळख मिळवण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. माझ्या पहिल्याच प्रोजेक्टमधून मला ओळख मिळाली. जगात फक्त एकच कांटा लगा गर्ल असू शकते आणि ती मी आहे. मला मरेपर्यंत 'कांटा लगा गर्ल' म्हणून ओळखले जावे ही माझी इच्छा आहे.'

Ind Vs Eng सामन्यापूर्वी भारताला मोठा धक्का, टीम इंडियाच्या कर्णधाराची तब्येत बिघडली
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.