Ekvira Temple: आता 'अशा' कपड्यांवरच मिळणार प्रवेश, एकवीरा मंदिरात ड्रेस कोड लागू; अंमलबजावणी कधीपासून?
esakal June 30, 2025 03:45 AM

भिवंडी : आगरी कोळी बांधवांसह लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या कार्ला येथील एकवीरा आईच्या मंदिरात तोकड्या कपड्यांवर बंदी घालण्यात आली आहे. ड्रेस कोडसंदर्भातील नव्या नियमांची अंमलबजावणी ७ जुलैपासून करण्यात येणार आहे, अशी माहिती कार्ला एकवीरा आई ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त खासदार सुरेश म्हात्रे यांनी दिली आहे. शुक्रवारी (ता. २७) कार्ला येथे आई एकवीरा देवीच्या मंदिरात विश्वस्त मंडळाच्या बैठकीत एकमताने ड्रेस कोडसंदर्भात हा ठराव मंजूर केल्याची माहिती खासदार म्हात्रे यांनी दिली आहे.

अनेक भक्तांनी समाजमाध्यमांद्वारे ड्रेस कोडसंदर्भात मागणी केली केली होती. भक्तांच्या मागणीनुसार विश्वस्त मंडळाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. या नव्या ड्रेस कोडद्वारे शॉर्ट, मिनी स्कर्ट, वेस्टर्न कपडे, फाटक्या जीन्स, हाफ पँट अशा कपड्यांना स्त्री व पुरुषांसाठी बंदी असणार आहे. दर्शनासाठी येणाऱ्या महिला भक्तांनी साडी, सलवार-कुर्ता किंवा इतर भारतीय पारंपरिक कपडे परिधान करावेत, तर पुरुषांनी धोतर, कुर्ता-पायजमा, पँट शर्ट, टी शर्ट व इतर पारंपरिक कपडे परिधान करावेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

भक्तांशी वाद

एकवीरा देवीच्या मंदिरात दर्शन घेताना येथील कर्मचारी भक्तांवर आरडाओरड करतात. भक्तांशी वाद घालतात, अशा तक्रारी विश्वस्त मंडळाकडे आल्या होत्या. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी भक्तांशी वाद न घालण्याच्या सूचना दिल्याची माहिती खासदार म्हात्रे यांनी दिली आहे.

Mumbai Crime: अर्धनग्न अवस्थेत पत्नीचा तर पती...; संशयास्पद स्थितीत जोडप्याचे मृतदेह आढळले, घातपात की...? गूढ वाढले सिद्धिविनायक मंदिरातही ड्रेस कोड लागू

मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात ३० जानेवारीपासून ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. त्यानुसार, भाविकांना मंदिरात प्रवेश करण्यासाठी सभ्य आणि शरीर झाकणारे कपडे घालावे लागतील. मंदिर प्रशासनाने असेही म्हटले आहे की, हाफ पँट, शॉर्ट्स, फाटलेल्या जीन्स, स्कर्ट आणि स्लीव्हलेस ड्रेस परिधान केलेल्या भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. ड्रेस कोड लागू करण्यामागील उद्देश मंदिराचे पावित्र्य आणि धार्मिक श्रद्धेचा आदर करणे आहे. भाविकांनी मंदिरात योग्य आणि आदरपूर्वक भेट द्यावी यासाठी हे केले जाते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.