चीनचं नाव ऐकताच अनेकांच्या मनात पहिल्यांदा चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांचं नाव समोर येतं, परंतु तुम्हाला हे माहीत आहे का? शी जिनपिंग यांच्यानंतर चीनमधील सर्वात पावरफूल्ल व्यक्ती कोण आहे? सोमवारी बीजिंगमध्ये पार पडलेल्या पोलीत ब्यूरोच्या महत्त्वाच्या बैठकीमधून या नेत्याचं नाव समोर आलं आहे. चीनमध्ये पोलीत ब्यूरोला सर्वात शक्तिशाली मानलं जातं. या पोलीत ब्यूरोमध्ये एकूण 24 सदस्य असतात.
चीनची वृत्तसंस्था असलेल्या शिन्हुआच्या रिपोर्टनुसार या पोलीत ब्यूरोच्या बैठकीमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांच्या कामांबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीमध्ये चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग जिथे बसले होते, बरोबर त्यांच्या शेजारीच कियांग बसले होते. ली कियांग यांनाच चीनचे दुसरे सर्वात शक्तिशाली व्यक्ती मानलं जातं.
कोण आहेत ली कियांग?
अधिकारीकरित्या ली कियांग हे चीनचे पंतप्रधान आहेत. 2022 मध्ये त्यांनी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यानंतर पोलीत ब्यूरोमधील दुसऱ्या क्रमाकांचा नेता म्हणून मान्यता देण्यात आली. ली यांचं वय 65 वर्ष असून ते शी जिनपिंग यांचे सर्वात जवळचे व्यक्ती असल्याचं मानलं जातं. ली कियांग यांनी आपल्या राजकीय करिअरची सुरुवात 1983 मध्ये केली होती. ते 1983 मध्ये पहिल्यांदाच कम्युनिष्ट पार्टीचे सदस्य बनले. त्यानंतर ली कियांग यांना 2012 मध्ये झेझियांग प्रांताचा प्रमुख बनवण्यात आलं. इथे त्यांच्या कामाचा आवाका बघून जिनपिंग यांनी त्यांची पदोन्नती राष्ट्रीय स्तरावर केली. त्यांना चीनचा सुधारनावादी नेता म्हणून देखील ओळखलं जातं.
ली कियांग हे चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यानंतर दोन नंबरचे सर्वात मोठे नेते आहेत.त्यांना तेथील सरकारने अनेक अधिकार प्रदान केले आहेत. ते शी जिनपिंग यांचे निकटवर्ती मानले जातात.
दरम्यान दुसरीकडे अशी देखील बातमी समोर येत आहे की, चीन आता पाकिस्तानसोबत मिळून सार्क सारखीच दुसरी प्रादेशिक संघटना तयार करण्याच्या प्रयत्नात आहे. या संदर्भात दोन बैठका देखील झाल्या आहेत. यातील एका बैठकीला बांगलादेश देखील उपस्थित होतं.