अहमदाबाद दुर्घटनेनंतर काही दिवसांपूर्वी दिल्लीहून आलेल्या विमानाला पक्षी धडकल्यामुळे विमानाचं उड्डाण रद्द करण्याची वेळ आली होती. आता यानंतर पुण्यातून एक धक्कादायक बाब समोर आली होती. धावपटट्टीवरील एका कुत्र्यामुळे भुवनेश्वरहून पुण्याला आलेल्या विमानाला लँडिंग करता आलं नाही. सुमारे तासभर हे विमान हवेतच असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.